Home ताज्या घडामोडी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवूया : अजित पवार

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवूया : अजित पवार

मुंबई
महाराष्ट्राच्या महान नेतृत्वास माझी विनम्र आदरांजली. स्वर्गीय बाळासाहेबांनी त्यांच्या नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य केलं. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा सन्मान व सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जीवनभर संघ र्ष केला. वमहाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना असा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आपण घडवूया असे आशा शब्दात अजित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. या निमित्तानं राज्यभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे. बाळासाहेब हे तमाम शिवसैनिकांचे दैवत. आपल्या दैवताला आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर शिवसैनिक गर्दी करतात. आज देखील सकाळपासूनच शिवसैनिकांची रीघ लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या रूपानं राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाल्यानं शिवसैनिकांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: तसं आवाहन केलं आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे शिवाजी पार्कवर बाळासाहेबांना अभिवादन करणार आहेत.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments