Home महाराष्ट्र जागतिक शौचालय दिन निमित्त विशेष अभियान

जागतिक शौचालय दिन निमित्त विशेष अभियान

अमरावती

जिल्हयातील हागदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये सार्वजनिक, वैयक्तीक, शाळ, अंगणवाडी मध्ये स्वच्छतेचे सातत्य कायम राहण्याठी तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, शौचालयाची योग्य देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे. साठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत 19 नोव्हेंबर या जागतिक शौचालय दिनामित्ताने दि. 17 ते 27 नोव्हेंबर, 2020 या कालावधीत विशेष अभियान राबविले जाणार असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीराम कुलकर्णी यांनी दिली.

जिल्हयात हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेचे सातत्य कायम राहण्यासाठी तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनसकि शौचालयांची उपलब्धता या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा 2 ची सुरुवात झाली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सदर अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

याचाच एक भाग म्हूणून दि. 19 नोव्हेंबरला होत असलेल्या जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक, वैयक्तिक, शाळा व अंगणवाडी शौचालया संदर्भात . 17 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत विशेष अभियान राबविले जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये सार्वजनिक, वैयक्तिक, शाळा व अंगणवाडी शौचालय बांधकाम करणे, निधी वितरण, देखभाल दुरुस्ती तसेच स्वच्छतेमधील सातत्य याबाबत गृहभेटी देऊन जनजागृती केली जाणर आहे. यामध्ये सार्वजनिक शौचालयामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करणे, सार्वजनिक शौचालयांना विज जोडणी उपब्ध करुन देणे, सार्वजनिक शौचालय परिसर स्वच्छता आणि सुशोभिकरण, नादुरुस्त सार्वजनिक शौचालय, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालयातील नादुरुस्त शौचालयांची दुरस्ती व वैयक्तीक शौचालयाचे बांधकाम व प्रोत्साहन अनुदान वाटप आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. उपक्रम राबविताना कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाबाबत आरोग्य विभागाने दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करण्याची दक्षता घेणे आवयक आहे. जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून जिल्हयातील शश्वत स्वच्छतेमधील सातत्या कायम ठेवण्यासाठी सर्व ग्रामपंचातींनी उत्स्फुर्त सहभाग घ्यावा असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी केले आहे.

जागतिक शौचालय दिनानिमित्त विशेष अभियानामध्ये राबविले जाणारे विशेष उपक्रम

* जिल्हयातील सर्व ग्रामपंचातीमध्ये सार्वजनिक, वैयक्तिक, शाळा व अंगणवाडी शौचालय बांधकाम करणे.

* बांधकामासाठी निधी वितरण, देखभाल दुरुस्ती करणे

* स्वच्छतेमधील सातत्य या बाबत गृहभेटी देऊन जनजागृती करणे

*सार्वजनिक शौचालयांना विज जोडणी उपलब्ध करुन देणे

*सार्वजनिक शौचालय परिसर स्वच्छता, कुटूंबस्तर शौचालय परिसर स्वच्छता आणि सुशोभिकरण

* नादुरुस्त सार्वजनिक शौचालय, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालयातील नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती

* वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम व प्रोत्साहन अनुदान वाटप

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments