Home विदर्भ धावत्या बैलगाडीच्या चाकात अडकली ओढणी; गळफास लागून युवतीचा मृत्यू

धावत्या बैलगाडीच्या चाकात अडकली ओढणी; गळफास लागून युवतीचा मृत्यू

अमरावती
दिवाळीनिमित्त कुटुंबीयांसमवेत फराळाचे साहित्य घेऊन नातेवाईकाकडे जाणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्थिनीचा बैलगाडीच्या चाकात ओढणी अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मेळघाटात घडली.

अस्मिता छगन भिलावेकर असे भूलोरी येथे राहणाऱ्या मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती चिखलदरा तालुक्यातील टेंब्रुसोडा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत नवव्या इयत्तेत होती. अस्मिताचे आई, वडील, आजी आणि आजोबा हे तिच्या मावशीकडे मन्सूधावडी येथे बैलगाडीने निघाले होते. रस्त्यात अस्मिताच्या गळ्यातील ओढणी बैलगाडीच्या चाकात अडकल्याने तिला गळफास लागला. काही क्षणात तिचा मृत्यू झाला. अस्मिताच्या कुटुंबीयांनी गळफास सोडवण्याचा प्रयत्न केला. पण, ओढणी काढता आली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

- Advertisment -

Most Popular

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

लोकशाहीरांनी कष्टकऱ्यांच्या चळवळीत चैतन्य जागविलेपालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती लोकशाहीर, थोर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी श्रमिकांच्या मनात क्रांतीची ठिणगी पेटविली. कष्टकरी, कामगार आणि शेतकऱ्यांच्या व्यथा- वेदनांना...

Recent Comments