Home Uncategorized कचरा हा कचरा नाहीच...!!

कचरा हा कचरा नाहीच…!!

प्रदीप बद्रे

गावात साफ-सफाईला सुरुवात झाली की, दिवाळी आली असा संस्कार बाल वयापासून प्रत्येकाच्या मनामनात ठसला आहे. यास कोणीही अपवाद असू शकत नाही. गावातील दिवाळीची मजा काही औरच अश्या शब्दांची संख्या मात्र आता वाढू लागली आहे. गावात पण पहिल्या सारखी मजा नाही ! आता असे बहुतेक सर्वच चाळीशी ओलांडलेले बोलताना सर्रास दिसतात. थोड विषयांतर होतय, पण ही वास्तविकता आहे. दिवाळी पुर्वी गावातील सर्व घरे स्वच्छ व लख्ख होतात पण. गाव मात्र अपवादाने स्वच्छ होते. पुर्वी दिवाळीला सलग पाच दिवस खतावर, शौचालयाजवळ, आंगधुणी जवळ दिवा उजळण्याची पध्दत होती व ती अजून कायम आहे. पण त्या मागचा भाव मात्र हरवला आहे. हे खेदाने म्हणावे लागते.

खर तर कचऱ्या कडे (Waste) म्हणून पाहण्याचा दृष्टीकोण बदलला पाहिजे. त्या कचऱ्याचे पण बरेच फायदे होवू शकतात जरत्याचे योग्य व्यवस्थापन केले तर. अन्यथा त्या कचऱ्या पासून पर्यावरणास हानी व पर्यायाने मणुष्यास आवश्यक पोषक वातावारणाचा ऱ्हास हे दुष्टचक्र न संपणारे आहे.सध्या ही समस्या शहरा कडून गावाकडे वळली असून, त्या समस्येवर गावाने एकत्र येवून काम करणे व कचऱ्याचे व सांडपाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. तरच गावाला मोकळा श्वास घेता येणे शक्य होईल. अन्यथा उकिरडयाच्या भव्य Flawerpot (फुलदाणी) नेच गावात आपले स्वागत होत राहणार, पुर्वी हे स्वागत हागणदारीच्या वासाने व्हायचे. आता ते प्रमाण खुप कमी झाले आहे. पण काही गावे अजूनही याला अपवाद आहेतच.गावाला कचरामुक्त, र्दुगंधीमुक्त, गटारमुक्त करुन समृध्द ग्राम निर्मीती करावयाची असेल तर पुढील प्रमाणे तिन गोष्टी चे सुयोग्य व्यवस्थापन करणे अनिवार्य आहे. या व्यवस्थापनातून ग्रामस्तरावर काही प्रमाणात रोजगार निर्मीती सुध्दा करता येवू शकते.

 

घनकचरा व्यवस्थापन  (Solid Waste Management)

गावातून निघणाऱ्या कचऱ्याचे दोन प्रकारे वर्गीकरण करता येईल. A) Biodegradable wasted म्हणजेच कुजणारा / विघटीत होणारा कचरा व B) Non Biodegradable waste न कुजणारा / विघटीत न होणारा कचरा.

A) Biodegradable wasted कचऱ्याचे व्यवस्थापन खालील प्रमाणे करता येईल.

1) खतखड्डा – खत खड्डयाचे दोन प्रकार आहेत. जमिनी खाली व जमिनीवर. या मध्ये जमिनी खाली तिन ते साडेतिन फुट आयताकृती खड्डा खोदून खड्डयाच्या तळाला नुसत्या कोरडया विटांचा थर (रेती, सिमेंटची गरज नाही) आथरावा. त्या विटांवर कोरडया कचऱ्याचा पहिलाथर (उदा- गवंडा, कुटार, कडबा, तुराटया, पऱ्हाटया, फन, पाला-पाचोळा ई.) लावावा. त्यावर ओला कचरा (उदा – शेण, खरकटे, ओला भाजी-पाला ई.) व शेवटी राखड (राख) किंवा गोठा झाडल्यावर जी माती निघते ती ई. चा पातळ थर टाकावा. या पध्दतीने खड्डा पुर्ण भरल्यानंतर, म्हणजेच जमिनीच्या समपातळी पर्यन्त भरल्या नंतर शेण व मातीचा गिलावा करुन लिपणे व दोन ते तिन महिणे खड्डा बंद ठेवणे. या मध्ये कचऱ्याचे शंभर टक्के विघटन होवून त्या पासून उत्तम NPK असलेले शुध्द व दर्जेदार शेंद्रीय खत प्राप्त होते. हीच पध्दत वापरुन जमिनीवर सुध्दा खड्डा करता येतो फक्त तो बांधिव खड्डा असावा लागतो.

नुसत्या उकिरडया मुळे शेतीला फायदा होण्या पेक्षा नुकसान होण्याचीच शक्यता जास्त असते. कारण उकिरडयात कचरा पुर्ण पणे कुजत नाही, विघटीत होत नाही. त्या मुळे उकिरडयावरिल खत जेव्हा शेतात जाते तेव्हा त्यात अनेक विषाणू-जिवाणू किंवा त्यांची अंडी जिवंत असतात. पावसाचे पाणी व ढगाळ वातावरण, आद्रता ई. पोषक वातावरणा मुळे विषाणू-जिवाणू किंवा त्यांची अंडी या पासून पिकांवर किडी प्रार्दुभाव जाणवतो पिकास प्रचंड प्रमाणात हानी होते. किडीच्या व्यवस्थापनावर आर्थीक नुकसान मात्र शेतकऱ्याला होते व विषयुक्त उत्पादन जनतेस मिळते. हे आपण एका खत खड्डया मुळे थांबवू शकतो. कचऱ्याला व्यवस्थीत विघटीत केल्या शिवाय त्याचा शेतीत वापर करु नये. सार्वजनिक कचऱ्यावर चालणारे शेंद्रीय खताचे प्रकल्प गावस्तरावर निर्माण केल्यास गावात रोजगार निर्मीती होवू शकते.

2) बायोगॅस – कचऱ्याच्या उत्तम व्यवस्थापना करिता बायोगॅस हा सुध्दा उत्तम पर्याय आहे. विघटीत होणाऱ्या कोणत्याही कचऱ्यावर बायोगॅस चालु शकतो. सध्या अनेक रुपात, आकारात व सहज परवडेल अश्या भावात बायोगॅसचे विविध मॉडेल बाजारात उपलब्ध आहे. अगदी शहरातील फ्लॅट (सदनिका) मध्ये सुध्दा लावता येईल व वापरता येईल असे बायोगॅस उपलब्ध आहे. हा पर्याय सार्वजनिक कचरा व्यवस्थापना साठी सुध्दा उत्तम आहे. बायोगॅस मधून निघनारी स्लरी शेती साठी उत्तम खत सुध्दा आहे.

3) गांडूळ खत – गांडूळ खता बाबत बरिच जनजागृती झाली आहे, पण तरीही अनेक ग्रामस्थ हे वैयक्तीक स्तरावर करण्यास चालढकल करित आहेत. यापासून पण उत्तम व दर्जेदार शेंद्रीय खत प्राप्त होते. या प्रकल्पचा दुहेरी फायदा आहे. उत्तम खत तर मिळतेच शिवाय खताचा राजा म्हणाव अस Lequide form मध्ये “व्हर्मीवॉश” सुध्दा मोफत मिळते. या बाबत सविस्तर माहिती व आर्थिक सहाय्य ई. ची माहिती कृषी विभागाकडून व कृषी सेवकाकडून मिळू शकते.

सांडपाणी –

ग्रामस्तरावर प्रतीव्यक्ती 50 ते 55 लिटर पाणी वापर निश्चित करण्यात आला आहे. (वास्तविकता काय आहे ते आपण जाणताच) प्रतीव्यक्ती 50 लिटर जरी पाणी वापर गृहीत धरला तरी या पैकी प्रत्यक्ष शरीराला लागणारे पाणी अंदाजे 10 लिटर जर पकडले (स्वयंपाक व पिण्यास लागणारे पाणी गृहीत धरुन) तर प्रती व्यक्ती किमान 40 लिटर पाणी Waste/ Gray water, सांडपाणी म्हणून बाहेर पडते. या पाण्याचा कोणीही गांभिर्याने विचार करताना दिसत नाही. हे पाणी आपण निसर्गा कडून घेतले होते. ते परत करणे ही प्रत्येकाचीच नैतिक जबाबदारी आहे. पण र्दुदैवाने ही जबाबदारी कोणी पार पाडताना दिसत नाही त्यामुळे सुध्दा जमिनीतील पाण्याची पातळी सतत कमी होत आहे.

या सांडपाण्याचे सर्वोत्तम व्यवस्थापन हे शोषखड्डा, लिचपिट, मॅजिक पिट याव्दारे करता येवू शकते. सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुर्नवार सुध्दा केल्या जावू शकतो.

प्लास्टिक बंदी – प्लास्टिक हा मानवासाठी व पर्यावरणासाठी महाभयंकर शाप आहे. प्लास्टीक वापरास महाराष्ट्रात बंदी आहे. ग्रामस्तरवर प्लास्टीक बंदीची अंमलबजावणी प्राधान्याने होणे गरजेचे आहे. ही बंदी कायदयाने नाही तर स्वयंशासनाने यायला हवी. गावातील सर्व प्लास्टीक जमा करुन ते रिसायकल करिता देण्यात यावे व प्लास्टिकचा वापर पुर्ण पणे बंद करावा.

नम्र विनंती – 1) कोणत्याही प्रकारचा कचरा जाळून नष्ट करु नये. कचरा जाळणे म्हणजे कचऱ्याचे व्यस्थापन नव्हे. प्रदुषण नियंत्रण मंडळाने यावर बंदी घातलेली आहे. कचरा जाळल्या मुळे घातक प्रदुषण होते, विविध श्वसनाचे आजार होतात, व कचऱ्या पासून मिळणारे खत मिळत नाही त्यामुळे आर्थीक नुकसान सुध्दा होते.

2) मुक्या जनावराना शिजलेले अन्न, शिळे अन्न, पिठ ई. खायला देवू नये. त्यांच्या पचनसंस्थेवर गंभिर परिणाम होवून ते दगावण्याची शक्यता असते.

शेवटि हे निसर्गचक्र आहे यामध्ये प्रत्येकाचेच योगदान गरजेचे आहे. आणी निसर्गाचाच नीयम आहे जे पेराल तेच उगवेल त्यामुळे किमान आपल्या सर्वांच्या समृध्द जगण्यासाठी व उद्याच्या उज्वल भवीष्यासाठी आपला वाटा उचलत पुढे जाऊया…..

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments