Home ताज्या घडामोडी साहेब आपण असता तर हिंदुत्वाशी तडजोड झाली नसती : नारायण राणे

साहेब आपण असता तर हिंदुत्वाशी तडजोड झाली नसती : नारायण राणे

मुंबई

“साहेब आपण असता तर हिंदुत्वाशी तडजोड झाली नसती” असे भाजपचे खासदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी म्हंटले आहे.बाळासाहेब ठाकरे यांनी पद आणि पैशांसाठी कुणाशाही प्रतारणा केली नसती असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या आठव्या स्मृतीदिनी ट्विट करुन त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

माननीय शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. माननीय साहेब आपण असता तर हिंदुत्वाशी तडजोड झाली नसती. पद आणि पैशांसाठी आपण तत्वांशी कधीही प्रतारणा केली नसती. महाराष्ट्रातील आताचे सरकार हे नीतीमत्ता सोडून केवळ तडजोडीवर तयार झाले आहे. आपण असता तर हे घडू दिले नसते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आठव्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन केलं असून यानिमित्ताने त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
नारायण राणे यांच्यासह त्यांचा मुलगा नितेश राणे यांनीही उद्धव ठाकरे यांचा इंदिरा गांधींना अभिवादन करताना फोटो ट्विट करत राहुल गांधी बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करतील का? असा प्रश्न विचारला आहे.

एकजूट तुटल्याची रामदास आठवले यांची खंत

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना शिवशक्ती भीमशक्ती आणि भाजपा यांची एकजूट तुटल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. आगामी काळात शिवसेना, भाजपा आणि रिंपाईने पुन्हा एकत्र येऊन एकजूट उभारली पाहिजे, ही खरी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली ठरणार असल्याचे मतही रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments