Home वन प्रवाशांनी रस्त्यावरचे खड्डे बुजवल्यावर धावली बस

प्रवाशांनी रस्त्यावरचे खड्डे बुजवल्यावर धावली बस

अमरावती

परतवाडा धारणी खंडवा इंदोर या राज्य महामार्ग क्र 6 वर मागील कित्येक दिवसापासून मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याने प्रवास करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या मार्गावर वाल वाहनांच्या अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एका खाजगी बस मधील चालक वाहक व प्रवाशांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची वेळ आली. प्रवाशांनी चक्क दगड माती टाकून खड्डे बुजवल्यावर त्यांची बस समोर धावली.
परतवाडा धारणी खंडवा इंदोर हा राज्य महामार्ग क्र 6 हा घाट वळणाचा रस्ता असून तो मेळघाटच्या जंगला मधून गेला आहे हा परिसर जंगल व्याप्त असल्यामुळे मागील दोन वर्षांत जगलांत पडलेल्या अति पाऊसामुळे परतवाडा धारणी मार्गा वर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडल्याने रस्त्याची चांगलीच दुर्दशा झाली तर काही ठिकाणी चाळण झाली असल्याने नागरिकांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे .
या मार्गावर अपघाताचे प्रमाणही वाढले आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूर चिखलदरा धारणी यांनी तर जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले असल्याने नागरिकांना त्याचा त्रास असाह्य झाला आहे.

दरम्यान खड्ड्यांमुळे रस्ता पार करू शकत नसल्यामुळे एका खाजगी बस चे चालक राशिद खां व वाहक विक्की सरोदे आणि प्रवासी पोलीस कर्मचारी राजू सोनवणे, प्रकाश नंदवंशी , राजा ठाकुर ,बबलू शरीफ दयाल बेलकर, शेख कय्यूम, जुगल गाडेराव यांच्यासह अनेक इतर प्रवाशांनी बस थांबवून खड्ड्यात दगड माती भरून खड्डे बुजविले. खड्डे बुजविल्यावर या मार्गावरून त्यांच्या बससह इतर वाहन धावायला लागली.

रस्त्याच्या दुर्दशेने कित्येक गर्भवती मातेसह रुग्णांना गमवावा लागला जीव

धारणी तालुक्यात ग्रामीण भागातील गर्भवती माता व इतर रुग्णाना उपचाराकरिता अमरावती येथे नेत असताना या खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागतो रस्त्यातील खड्यातुन वाहन जात असल्याने झटके सहन करावे लागते त्यासह वेळ सुद्धा जास्त लागत असल्याने धारणी वरून उपचारा करिता रेफर केलेल्या रुग्णाना वेळेवर उपचार मिळत नाही तर काही गर्भवटी माता ना झटक्याच्या त्रासामुळे जनगलातच प्रसुटीचा सामना करावा लागत असल्याने अनेक मातांना जीव गमवावा लागला आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments