Home ताज्या घडामोडी सावधान ! कोरोनाची दुसरी लाट येणार

सावधान ! कोरोनाची दुसरी लाट येणार

अमरावती

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली असून त्याबाबत सावधगिरी म्हणून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आल्याची माहिती जिल्हाधिकरी शैलेश नवाल यांनी दिली आहे. पुढचा दीड महिना सगळ्यानी काळजी घेण्याची आवहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

गत काही दिवसंपासून मंदावलेल्या कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार असून मास्क न घालणे, सोशल डिस्टंसिंग न ठेवणे आदी नियम भंग करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई देखील व्यापक स्वरुपात केली जाणार आहे. मास्कचे महत्व हे नागरीकांच्या मनावर बिंबविणे अत्यंत आवश्यक असून सध्यातरी लस उपलब्ध नसल्यामुळे मास्क हाच संसर्गापासून वाचण्याचा एकमेव उपाय आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल येथे ऑक्सीजन टँक कार्यान्वित झाला असून पीडीएमसी रुग्णालयातही येत्या दोन दिवसात काम पूर्ण होईल. कोरोना प्रतिबंधासाठी दक्षता नियमांचे पालन नागरीकांनी काटेकोरपणे करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments