Home ताज्या घडामोडी भारती सिंहला अटक, घरात आढळले ड्रग्स

भारती सिंहला अटक, घरात आढळले ड्रग्स

मुंबई

कॉमेडियन भारती सिंहला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. एनसीबी ( अंमली पदार्थ विरोधी पथक) ने ही कारवाई केली. शनिवारी सकाळी या पथकाने भारती सिंहच्या घरावर आणि त्यानंतर कार्यालयावर धाड टाकली. यावेळी झाडाझडीदरम्यान भारतीच्या घरात गांजा आढळला.हा गांजा एनसीबीच्या पथकाने जप्त केला आहे. भारती आणि तिचा पती या दोघांनीही गांजा बाळगल्याचं मान्य केलं असून भारतीला अटक करण्यात आली आहे.

एनसीबीने भारतीच्या ऑफिस आणि घरावर छापा मारला त्यामध्ये त्यांना ८६.५ ग्रॅम गांजा सापडला. हा गांजा जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर आज सकाळीच भारतीला ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र आता तिला अटक करण्यात आली आहे. ड्रग पेडलरने दिलेल्या माहितीनंतर ही छापेमारी करण्यात आली होती.अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावं समोर आली होती. या यादीत आता प्रसिद्धी कॉमेडियन भारती सिंह हिचं देखील नाव समाविष्ट झाले आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments