Home ताज्या घडामोडी राज्यपालांविरोधात पुन्हा ठिणगी ; मुदत संपूनही १२ आमदारांची निवडीला मंजुरी नाही

राज्यपालांविरोधात पुन्हा ठिणगी ; मुदत संपूनही १२ आमदारांची निवडीला मंजुरी नाही

मुंबई

विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या निवडीसाठी पाठवलेली यादी २१ नोव्हेंबरपर्यंत राज्यपालांनी मंजूर करावी, अशी विनंती राज्य सरकारने केली असताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना शनिवारी मुदत संपत असतानाही कुठलीही हालचाल केली नसल्याने या विषयावरून येर्या काळात महाराष्ट्र सरकार विरुद्ध राज्यपाल, असा पुन्हा एकदा संघर्ष होण्याची चिन्ह आहेत.

 

महाराष्ट्र सरकारकडून ६ नोव्हेंबरला विधान परिषदेसाठीच्या १२ नावांचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि काँग्रेसचे अमित देशमुख यांनी यासंदर्भात राज्यपालांची भेट घेऊन १२ उमेदवारांच्या नावांची यादी सोपवली होती. राज्यपालांनी २१ नोव्हेंबरपर्यंत यादी मंजूर करावी, अशी शिफारसवजा विनंतीही त्यावेळी करण्यात आली होती.

या उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे, काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन आणि अनिरुद्ध वनकर; तर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी या नावांचा समावेश आहे.

महाविकास आघाडीकडून २१ नोव्हेंबरला यादी जाहीर करण्याबाबत करण्यात आलेल्या विनंतीची मुदत २१ नोव्हेंबरला संपत असली, तरी राजभवनाकडून यादी जाहीर करण्याबाबत अद्याप काहीच माहिती मुख्यमंत्री कार्यालयाला देण्यात आलेली नाही. ही यादी जाहीर करण्याबाबत राज्यपालांकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप याआधीच महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी केला होता. त्यामुळे यादी देतानाच मुदतीची शिफारस करण्यामागेही महाविकास आघाडीची रणनिती होती. साहजिकच आता राज्य सरकार आणि राज्यपाल, असा संघर्ष पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments