Home ताज्या घडामोडी अन् फडणवीस झालेत 'ऱ्हस्व' !

अन् फडणवीस झालेत ‘ऱ्हस्व’ !

अमरावती

उच्चविद्याविभूषित शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून विधानपरिषदेत जाण्यास सज्ज असणारे अमरावती विभाग शिक्षक मतदार संघात भाजपचे उमेदवार डॉ. नितीन धांडे यांच्या प्रचारासाठी अमरावती येथेआयोजित शिक्षकांच्या प्रचारसभेत भव्य सभामंचावर लागलेल्या फलकावर देवेंद्र ‘फडणवीस‘ ऱ्हस्व झाल्याने चर्चेला पेव फुटले.

खरं तर् फडणवीस यां आडनावतील ‘वी‘ ची वेलांटी दीर्घ हवी असताना तीं सभामंचावर भल्यामोठ्या अक्षरात ऱ्हस्व लिहून ठेवली. आता सभेत उपस्थित मराठीच्या आणि त्यातही खरोखर मराठीत हुशार असणाऱ्या शिक्षकांमध्ये ‘अरे फडणवीस दिर्घचे ऱ्हस्व झालेत’ अशी चर्चा रंगली. निदान शिक्षकांच्या सभेत उपस्थित असणारे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांचे आडनाव असे चुकीचे लिहिलेले अनेकांना खटकलेच.

 

.

- Advertisment -

Most Popular

अनाथ आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार- महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांची ग्वाही

अमरावती राज्य सेवा आयोग परीक्षेसाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या अनाथ आरक्षणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे यामुळे राज्यसेवा...

अमरावतीत हवालाचे साडेतीन कोटी रुपये जप्त

दोन चारचाकी वाहनांसह सहा जण ताब्यात अमरावती दोन स्कॉर्पिओ वाहनातून नेण्यात येत असलेली हवालाचे...

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

Recent Comments