Home ताज्या घडामोडी भाजपने काढली सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

भाजपने काढली सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

अमरावती
कोरोना काळात आलेले वीज बिल माफ करू किंव्हा कामी करू असे आश्वासन देऊन शासनाने आता जसे आले तसे वीज बिल भरावेच लागणार असे स्पष्ट केल्याने भाजपच्यावतीने आज महाविकास आघाडी शासनाची प्रेतयात्रा काढली आणि वीज बिलांची होळी केली.


भाजपचे शहर अध्यक्ष किरण पातुरकर यांच्या नेतृत्वात राजकमल चौक येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य शासनाविराधात घोषणा देण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी सोबत आणलेल्या वीज बिलांची होळी यावेळी करण्यात आली. दरम्यान काही कार्यकर्त्यांनी नेहरू मैदान येथून सरकारची प्रतिकात्मक यात्रा काढली. राजकमल चौक येथे येताच पोलिसांनी तिरडीवरील पुतळा जप्त केला. यावेळी राजकमल चौकात बराच गोंधळ उडाला. यां आंदोलनात जयंत डेहणकार,प्रा.रवींद्र खांडेकर, नगरसेवक सुरेखा लुंगारेप्रणित सोनी, संध्या टिकले यांच्यासहशिल्पा पाचघरे, लता देशमुख, सुषमा कोठीकर, श्रद्धा गहलोत, मिलिंद बांबल आदी शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments