Home ताज्या घडामोडी दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यातून येणाऱ्यांना महाराष्ट्रात कोरोना टेस्ट सक्तीची

दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यातून येणाऱ्यांना महाराष्ट्रात कोरोना टेस्ट सक्तीची

मुंबई

दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा या चार राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढायला लागली असताना या चारही राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकाला कोरोना चाचणी करणे सक्तीचे आहे.
यासंबंधीचा आदेशच महाराष्ट्र सरकारने काढला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने हा आदेश काढला आहे. यासंबंधीची मार्गदर्शक सूचनाही जाहीर केली आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांमुळेही करोनाचा संसर्ग वाढू शकतो ही बाब लक्षात घेऊन हा आदेश काढण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने यासंदर्भातील नियमावली जाहीर केली आहे.

चाचणी शुल्क प्रवशंकडून आकरणार
दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा या चार राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांनी 96 तास आधी आरटीपीसीआर निगेटिव्ह असणं आवश्यक आहे.
आरटी पीसीआर टेस्ट रिपोर्टचा अहवाल ज्या प्रवाशांसोबत नसेल त्यांना विमानतळावर आल्यानंतर ती टेस्ट करावीच लागेल. विमानतळांनी यासंदर्भातले टेस्टिंग सेंटर्स उभारले पाहिजेत. यां चाचणीचे शुल्क प्रवाशांकडून घेण्यात येईल.

- Advertisment -

Most Popular

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

अमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...

संभ्रमित पालक

कोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...

Recent Comments