Home ताज्या घडामोडी प्राध्यापिकेला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या प्राचार्यांविरोधात गुन्हा दाखल

प्राध्यापिकेला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या प्राचार्यांविरोधात गुन्हा दाखल

अमरावती
महाविद्यालयातील प्राध्यापक महिलेस शरीर सुखाची मागणी करून तिचा मानसिक छळ करणाऱ्या मूर्तिजापूर येथील संत गाडगेबाबा महाविद्यालयाचे प्राचार्य व सिनेट सदस्य संतोष ठाकरे याच्यावर मूर्तीजापुर पोलीसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे अमरावती विभागातील शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी फिर्यादी प्राध्यापिकेने 13 नोव्हेंबरला मूर्तीजापुर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीपूर्वी त्यांनी अमरावती येथे पत्रपरिषद घेवून प्राचार्य संतोष ठाकरे यांच्या कृत्यांचा पर्दाफाश केला होता. त्यांच्यावर शिवीगाळ करून विनयभंग केल्याचा, दबावतंत्राचा वापर केल्याचा आरोप केला होता. यानंतर त्यांनी मूर्तीजापुर पोलीसात तक्रार दिली आहे. महिला प्राध्यापिकेने दिलेल्या तक्रारीत धक्कादायक बाबी नमूद केल्या आहेत. प्राचार्य संतोष ठाकरे यांनी फिर्यादी महिलेस मूर्तीजापुर येथील फ्लॅटवर येवून शारीरिक संबंधित प्रस्थापित केल्याशिवाय सातव्या वेतन आयोग लागू होवू देणार नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. फिर्यादी प्राध्यापिका २००९ पासून मूर्तीजापुर येथील गाडगेमहाराज विद्यालयात कार्यरत आहेत. तर संतोष ठाकरे प्राचार्य म्हणून २२ जून २०१६ पासून रूजू झाले. प्राचार्य संतोष ठाकरे यांनी त्यांचेसोबत जवळीक वाढवून लगट करण्याचा सतत प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. प्राचार्य ठाकरे यांनी फिर्यादी प्राध्यापिक महिलेस अमरावती येथे कारने सोडून देण्याच्या बहाण्याने लगट साधण्याचा प्रयत्न केला. प्रमोशनचे आमीष देखील देण्यात आले. याच काळात त्यांनी फिर्यादी महिलेवर प्रेम असल्याचे सांगून युरोप टूवर नेण्याचे आमीष दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

४ ऑक्टोबर २०१९ रोजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत स्वच्छता अभियान सुरु असतांना अन्य प्राध्यापकांसमोर मैदानावर प्राचार्य संतोष ठाकरे यांनी आपणास अश्लील भाषेत शिवीगाळ केली. आपणास निलंबित करण्याची धमकी दिली. त्यांनी शैक्षणिक कार्यात व्यत्यय आणून त्रास देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितमध्ये अडचणी निर्माण केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. वेतन निश्चित मंजूर असतांना त्यांनी त्यात अडचणी निर्माण केला. आपण माफी मागावी यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आला. मात्र आपण माफी मागण्यास स्पष्टपणे नकार दिला. आपणास शब्दांनी अपमानित करून नोकरीतून काढण्याची धमकी दिली असल्याचेही बाब तक्रारीत नमूद आहे. आपणासवर मानसिक व आर्थिक त्रास देण्याच्या दृष्ट बुद्धीने ठाकरे यांनी सातव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव पाठविला नाही.

याप्रकरणी मूर्तीजापुर  पोलीसांनी तब्बल 10 दिवसानंतर प्राचार्य संतोष ठाकरे यांच्याविरोधात भादंविच्या कलम ३५४ (अ), ३५४(ड), ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

शैक्षणिक वर्तुळात खळबळ

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ टीचर्स असोसिएशनचे पदाधिकारी, सिनेट सदस्य प्राचार्य संतोष ठाकरे यांच्यावर महिला प्राध्यापिकेच्या तक्रारीवरून विनयभंग व दबाव टाकण्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने विभागातील शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments