Home ताज्या घडामोडी प्राध्यापिकेला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या प्राचार्यांवितोधात गुन्हा दाखल

प्राध्यापिकेला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या प्राचार्यांवितोधात गुन्हा दाखल

अमरावती
महाविद्यालयातील प्राध्यापक महिलेस शरीर सुखाची मागणी करून तिचा मानसिक छळ करणाऱ्या मूर्तिजापूर येथील संत गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य व सिनेट सदस्य डॉ.संतोष ठाकरे याच्यावर मूर्तीजापुर पोलीसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी फिर्यादी प्राध्यापिकेने मूर्तीजापुर पोलीस ठाण्यात 13नोव्हेंबरला तक्रार दिली आहे. तक्रारीपूर्वी त्यांनी अमरावती येथे पत्रपरिषद घेवून प्राचार्य संतोष ठाकरे यांच्या कृत्यांचा पर्दाफाश केला होता. त्यांच्यावर शिवीगाळ करून विनयभंग केल्याचा, दबावतंत्राचा वापर केल्याचा आरोप केला होता. यानंतर त्यांनी मूर्तीजापुर पोलीसात तक्रार दिली आहे. महिला प्राध्यापिकेने दिलेल्या तक्रारीत धक्कादायक बाबी नमूद केल्या आहेत. प्राचार्य संतोष ठाकरे यांनी फिर्यादी महिलेस मूर्तीजापुर येथील फ्लॅटवर येवून शारीरिक संबंधित प्रस्थापित केल्याशिवाय सातव्या वेतन आयोग लागू होवू देणार नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. फिर्यादी प्राध्यापिका २००९ पासून मूर्तीजापुर येथील गाडगेमहाराज विद्यालयात कार्यरत आहेत. तर संतोष ठाकरे प्राचार्य म्हणून २२ जून २०१६ पासून रूजू झाले. प्राचार्य संतोष ठाकरे यांनी त्यांचेसोबत जवळीक वाढवून लगट करण्याचा सतत प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. प्राचार्य ठाकरे यांनी फिर्यादी प्राध्यापिक महिलेस अमरावती येथे कारने सोडून देण्याच्या बहाण्याने लगट साधण्याचा प्रयत्न केला. प्रमोशनचे आमीष देखील देण्यात आले. याच काळात त्यांनी फिर्यादी महिलेवर प्रेम असल्याचे सांगून युरोप टूवर नेण्याचे आमीष दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

४ ऑक्टोबर २०१९ रोजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत स्वच्छता अभियान सुरु असतांना अन्य प्राध्यापकांसमोर मैदानावर प्राचार्य संतोष ठाकरे यांनी आपणास अश्लील भाषेत शिवीगाळ केली. आपणास निलंबित करण्याची धमकी दिली. त्यांनी शैक्षणिक कार्यात व्यत्यय आणून त्रास देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितमध्ये अडचणी निर्माण केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. वेतन निश्चित मंजूर असतांना त्यांनी त्यात अडचणी निर्माण केला. आपण माफी मागावी यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आला. मात्र आपण माफी मागण्यास स्पष्टपणे नकार दिला. आपणास शब्दांनी अपमानित करून नोकरीतून काढण्याची धमकी दिली असल्याचेही बाब तक्रारीत नमूद आहे. आपणासवर मानसिक व आर्थिक त्रास देण्याच्या दृष्ट बुद्धीने ठाकरे यांनी सातव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव पाठविला नाही.

याप्रकरणी मूर्तीजापुर पोलीसांनी तक्रार दिल्यावर 10 दिवसानंतर प्राचार्य डॉ. संतोष ठाकरे यांच्याविरोधात भादंविच्या कलम ३५४ (अ), ३५४(ड), ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

शैक्षणिक वर्तुळात खळबळ

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ टीचर्स असोसिएशनचे पदाधिकारी, सिनेट सदस्य प्राचार्य संतोष ठाकरे यांच्यावर महिला प्राध्यापिकेच्या तक्रारीवरून विनयभंग व दबाव टाकण्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने विभागातील शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisment -

Most Popular

अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना सरसकट 25000 रु. मदत जाहीर करा : खासदार नवनीत राणा

अमरावतीजिल्ह्यातील तिवसा मतदार संघात येणाऱ्या पूरग्रस्त गावांची खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पाहणी केली. पुरामुळे झालेल्या नुकसान आढावा घेतल्यावर खासदार नवनीत राणा...

बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील: ॲड. यशोमती ठाकूर

अनंत यातनांवर मात करीत त्यांनी घेतली भरारी….त्यांच्या पंखात शिक्षणाचे बळ भरणार… मुंबई, बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या...

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करा : कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

अमरावतीपीक विमा मिळण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज करूनही विमा कंपनीकडून त्यावर कार्यवाही न झाल्याच्यातक्रारीची तातडीने दखल घेऊन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी थेट...

संभ्रमित पालक

कोरोणाची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटे बाबत शाशंक आणि भितित असताना हळू हळू आपला जीवनक्रम सुरळीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे….म्हणजे...

Recent Comments