Home ताज्या घडामोडी जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेतील पदभरतीबाबत शासन सकारात्मक: सहकार मंत्र्यांची ग्वाही

जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेतील पदभरतीबाबत शासन सकारात्मक: सहकार मंत्र्यांची ग्वाही

अमरावती

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रिक्त पदभरतीबाबत सकारात्मक कार्यवाही होईल, अशी ग्वाही राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सहकार संस्थांचे जाळे मजबूत होण्यासाठी विविध प्रयत्न होत आहेत, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिली.

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रिक्त असलेल्या पदभरतीबाबत पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्याकडून वेळोवेळी पाठपुरावा होत आहे. त्याअनुषंगाने त्यांनी आज सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची मंत्रालयात भेट घेऊन पदभरतीबाबत मान्यता, अपेक्षित प्रक्रिया आदी कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा केली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखेडे, माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

बाळासाहेब. पाटील म्हणाले की, अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पदभरतीच्या अनुषंगाने राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. सहकार क्षेत्रातील विविध अडचणी सोडविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटीबध्द आहे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील विविध प्रश्नांबाबतही यावेळी चर्चा झाली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात ठेवी असून शेतकऱ्यांच्या विश्र्वासहर्तेवर बँकेचे कामकाज सुरु आहे. डिसीसी बँकेत मोठ्या प्रमाणात अधिकारी-कर्मचाऱ्यांचे रिक्त पदे असून ही पदे तत्काळ भरण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. सहकार क्षेत्रासह प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात येईल, असे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments