Home ताज्या घडामोडी कोरोना लस हवी आहे तर 'चलो अमेरिका'

कोरोना लस हवी आहे तर ‘चलो अमेरिका’

मुंबई

भारतात कोरोना वाक्सिन उपलब्ध होण्यास अद्याप वेळ असताना मुंबईतील एका टुरिझम कंपनीने लोकांसाठी अमेरिकेत ‘व्हॅक्सिन टुरिझम’ची ऑफर दिली आहे. चार दिवस राहून करोना व्हायरसवरील लस घेता येईल, अशी ही ऑफर आहे.

मुंबईतील Gem Tours & Travels ने व्हॅक्सिन टुरिझमची ऑफर आणली असून या ऑफरअंतर्गत लोक अमेरिकेत जाऊन करोना लस घेऊ शकतात. कंपनी डिसेंबर महिन्यात अमेरिकेला जाण्यासाठी आकर्षक अशा पॅकेजची ऑफर देत आहे. लस घेण्यासोबतच अमेरिकेत 4 दिवस राहताही येईल. यासाठी 1 लाख 74 हजार 999 रुपयांच्या पॅकेजची घोषणा कंपनीने केली आहे. पॅकेजमध्ये मुंबईहून न्यूयॉर्कच्या विमान प्रवासाचं भाडं, हॉटेलमध्ये तीन रात्र आणि चार दिवस राहण्याची सोय, सकाळचा नाश्ता आणि व्हॅक्सिनचा एक डोस यांचा समावेश आहे.

याबाबत कंपनीने , “आम्ही व्हॅक्सिन टुरिझम विकसित करत आहे. आमच्याकडे व्हॅक्सिन नाहीये किंवा आम्ही ते खरेदीसुद्धा करत नाही. सर्व अमेरिकेच्या कायद्यानुसार होईल. कशाप्रकारे अमेरिका व्हॅक्सिन उपलब्ध करून देते याचीही माहिती दिली जाईल. पण आम्ही कोणत्याही प्रकारे अॅडव्हान्स किंवा डिपॉझिट घेत नाहीये. रजिस्ट्रेशनसाठी केवळ नाव, ईमेल, मोबाइल नंबर, वय, आजाराची माहिती आणि पासपोर्टची कॉपी घेतली जात आहे. पुढील प्रक्रिया अमेरिकेच्या आरोग्य विभागाच्या परवानगीनुसार पूर्ण करण्यात येईल”, असं म्हटलं आहे. तसेच, अमेरिका जोपर्यंत अधिकृतपणे अमेरिकी नागरिकांशिवाय अन्य लोकांना व्हॅक्सिन देण्याची घोषणा करत नाही तोपर्यंत आम्हीही व्हॅक्सिन देऊ शकत नाही, असंही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

- Advertisment -

Most Popular

अनाथ चिमुकल्यांना महिला व बालविकास मंत्र्यांनी मिळवून दिला आधार

अमरावती मातापित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षण व भविष्यासाठी तरतूद करत महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या...

सोमेश्वरभाऊ पुसतकर –One Man Organization !

अतुल विडूळकर भाऊंना जाऊन आज एक वर्ष होत आहे. पहिला स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्याबद्दल काही लिहावं, इतकं औपचारिक नातं...

सोमेश्वर पुसतकर लोक गौरव पुरस्काराचे वितरण

नानक रोटी ट्रस्ट पहिल्या पुरस्काराचे मानकरी अमरावती गत तीन वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता शहरातील भुकेल्यांना...

युवा स्वाभिमान पार्टीने महापालिकेसमोर टाकला कचऱ्याचा ढिगारा

अमरावतीअमरावती महानरक पालिकेच्या काही नगरसेवक ,अधिकारी तसेच ठेकेदार यांच्या साठगाठीमुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे त्यामुळे डेंगू मलेरिया चे आजार होत...

Recent Comments