Home ताज्या घडामोडी शेतकरी संतापले: दिल्लीत मोर्चा

शेतकरी संतापले: दिल्लीत मोर्चा

नवी दिल्ली

केंद्र सरकारनं विरोधकांचा विरोध झुगारत देशभरात लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे हजारो शेतकरी संतापले असून आता ‘दिल्ली चलो’ आंदोलनात सहभागी झाले आहेत. दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना मोर्चाची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे शेतकरी आणि शासकीय यंत्रणा यांच्यात पुन्हा एकदा राडा होण्याची शक्यता आहे.

परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यसााठी राजधानीच्या सीमेवर मोठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आलीय. शेतकऱ्यांना दिल्लीत घुसू देऊ नये, असे निर्देशच पोलिसांना देण्यात आलेले आहेत.

सध्या, शेतकरी करनाल जवळ पोहचलेले आहेत. फरीदाबादमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलंय. शेतकऱ्यांनी अन्न-पाणी सोबत घेऊनच राजधानीकडे कूच केलीय. जिथे पोलीस थांबवतील तिथेच ठाण मांडून बसण्याची योजना शेतकऱ्यांनी आखलीय.दिल्लीला लागून असलेल्या पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांनी मंगळवारी गावांतील रस्त्यावरून घुसण्याचा प्रयत्न केला. पर त्यांना पोलिसांनी रोखलं. कोणत्याही आंदोलनात सहभागी होऊ नये, असं फर्मानचं पोलिसांकडून शेतकऱ्यांसाठी काढण्यात आलंय. इतर राज्यांतून दिल्लीत शेतकरी आले तर त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही पोलिसांनी म्हटलंय.

पोलिसांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, पंजाबहून जवळपास २,००,००० (दोन लाख) शेतकरी २६ नोव्हेंबरपासून ‘दिल्ली चलो’ आंदोलनांतर्गत दिल्लीला रवाना होण्यासाठी तयार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रदर्शनामुळे अनेक ठिकाणी जाम लागण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

Most Popular

कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा: ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई,  कुपोषणावर मात करण्यासाठी ‘पोषण माह’मध्ये राबवण्यात येणारे उपक्रम आणि त्यासाठीचा सहभाग वाढवून देशामध्ये पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करा....

आता रुग्णालयाचे प्रशासन आगीच्या घटनांसाठी जबाबदार

मुंबई कोरोना काळात रुग्णालयांना आगी लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित  रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे....

नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावी बच्चू कडू यांचे निर्देश

अमरावती जिल्ह्याचा सर्वांगिण विकास हा ग्रामविकासातून होत असतो. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेली रस्ते, पुल, शाळा, रुग्णालये...

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा : ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी...

Recent Comments