प्राध्यापिकेला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या प्राचार्यांवितोधात गुन्हा दाखल

अमरावती
महाविद्यालयातील प्राध्यापक महिलेस शरीर सुखाची मागणी करून तिचा मानसिक छळ करणारे मुर्तिजापूर येथील संत गाडगेबाबा महाविद्यल्याच प्राचार्य व संत गाडेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य संतोष ठाकरे याच्यावर मूर्तीजापुर पोलीसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे अमरावती विभागातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी फिर्यादी प्राध्यापिकेने मूर्तीजापुर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रार दिल्यावर त्यांनी अमरावती येथे पत्रपरिषद घेवून प्राचार्य संतोष ठाकरे यांच्या कृत्यांचा पर्दाफाश केला होता. त्यांच्यावर शिवीगाळ करून विनयभंग केल्याचा, दबावतंत्राचा वापर केल्याचा आरोप केला होता. यानंतर त्यांनी मूर्तीजापुर पोलीसात तक्रार दिली आहे. महिला प्राध्यापिकेने दिलेल्या तक्रारीत धक्कादायक बाबी नमूद केल्या आहेत. प्राचार्य संतोष ठाकरे यांनी फिर्यादी महिलेस मूर्तीजापुर येथील फ्लॅटवर येवून शारीरिक संबंधित प्रस्थापित केल्याशिवाय सातव्या वेतन आयोग लागू होवू देणार नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. फिर्यादी प्राध्यापिका २००९ पासून मूर्तीजापुर येथील गाडगेमहाराज विद्यालयात कार्यरत आहेत. तर संतोष ठाकरे प्राचार्य म्हणून २२ जून २०१६ पासून रूजू झाले. प्राचार्य संतोष ठाकरे यांनी त्यांचेसोबत जवळीक वाढवून लगट करण्याचा सतत प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. प्राचार्य ठाकरे यांनी फिर्यादी प्राध्यापिक महिलेस अमरावती येथे कारने सोडून देण्याच्या बहाण्याने लगट साधण्याचा प्रयत्न केला. प्रमोशनचे आमीष देखील देण्यात आले. याच काळात त्यांनी फिर्यादी महिलेवर प्रेम असल्याचे सांगून युरोप टूवर नेण्याचे आमीष दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

४ ऑक्टोबर २०१९ रोजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत स्वच्छता अभियान सुरु असतांना अन्य प्राध्यापकांसमोर मैदानावर प्राचार्य संतोष ठाकरे यांनी आपणास अश्लील भाषेत शिवीगाळ केली. आपणास निलंबित करण्याची धमकी दिली. त्यांनी शैक्षणिक कार्यात व्यत्यय आणून त्रास देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितमध्ये अडचणी निर्माण केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. वेतन निश्चित मंजूर असतांना त्यांनी त्यात अडचणी निर्माण केला. आपण माफी मागावी यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आला. मात्र आपण माफी मागण्यास स्पष्टपणे नकार दिला. आपणास शब्दांनी अपमानित करून नोकरीतून काढण्याची धमकी दिली असल्याचेही बाब तक्रारीत नमूद आहे. आपणासवर मानसिक व आर्थिक त्रास देण्याच्या दृष्ट बुद्धीने ठाकरे यांनी सातव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव पाठविला नाही.

दरम्याम 13 नोव्हेंबर ला पीडित प्राधायपीकेने मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तब्बल 10 दिवसानंतरमूर्तीजापुर पोलीसांनी प्राचार्य संतोष ठाकरे यांच्याविरोधात भादंविच्या कलम ३५४ (अ), ३५४(ड), ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

शैक्षणिक वर्तुळात खळबळ

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ टीचर्स असोसिएशनचे पदाधिकारी, सिनेट सदस्य प्राचार्य संतोष ठाकरे यांच्यावर महिला प्राध्यापिकेच्या तक्रारीवरून विनयभंग व दबाव टाकण्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने विभागातील शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.