ब्रेकिंगमहाराष्ट्र

हिंजवडीतील गॅस एजन्सीवर जिल्हा प्रशासनाची कारवाई; पुरवठा व वितरण तात्काळ बंद

नियमभंग, जादा दराने विक्री आणि अनधिकृत वितरण प्रकरणी परवाना निलंबित

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

 

रयतनामा पुणे, दि. २८ : हिंजवडी येथील मे. श्री लक्ष्मी भारतगॅस या गॅस एजन्सीवर जिल्हा प्रशासनाने कडक कारवाई करत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा पुरवठा व वितरण तात्काळ प्रभावाने बंद केले आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, संबंधित एजन्सीचा परवाना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जिल्हा पुरवठा शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या एजन्सीकडे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) मार्फत व्यावसायिक एलपीजी सिलेंडर विक्रीचा अधिकृत परवाना होता. मात्र, २६ मार्च २०२६ रोजी सिलेंडर वितरण करताना शासनाने ठरवून दिलेल्या प्राधान्यक्रमाचे उल्लंघन केल्याचे आढळले.

तपासात असेही समोर आले की, एजन्सीकडून अनधिकृत व नोंदणी नसलेल्या व्यक्तींना सिलेंडर वितरित करण्यात आले. तसेच अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने जादा दराने विक्री करण्यात येत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

या प्रकारामुळे नागरिकांमध्ये एलपीजी पुरवठ्याबाबत संभ्रम निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने कारवाई केली.

दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी BPCL ला आदेशांची तात्काळ अंमलबजावणी करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे