विजय विकास सामाजिक संस्था, नवघर तर्फे आयोजित कार्यक्रम रद्द
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.20
सर्वांचे लाडके व भोईर कुटुंबाचे ज्येष्ठ, विजय विजय विकास सामाजिक संस्था, नवघर तर्फे आयोजित कार्यक्रम रद्द विकास भोईर यांचे चुलत भाऊ (दादा) कै. किसन सखाराम भोईर यांचे शनिवार दि. १४.०९.२०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. विजय भोईर (रायगड जिल्हा परिषद सदस्य ) व विकास भोईर (प्रोप्रायटर – ब्लू स्टार सिक्युरिटी व फैसीलिटी सर्विसेस) यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ आयोजित केलेले विविध कार्यक्रम जसे पारंपारिक फेरीचे डान्स स्पर्धा, कराटे स्पर्धा, पोहण्याच्या स्पर्धा, आदिवासी वाडीवरील मुलांना शाळेपयोगी वस्तू व फलाहार वाटप, फळी स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा व अभिष्टचिंतन सोहळा येत्या दि. २२ सप्टेंबर रोजी होणार होते तरी हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. तरी सर्व विजय विकास सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व विजय भोईर, विकास भोईर यांच्यावर जीवापर प्रेम करणारे आप्तेष्ट व मित्रपरिवार यांनी याची नोंद घ्यावी.ही सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.अशी माहिती विजय विकास सामाजिक संस्थेने दिली असून कै. किसन सखाराम भोईर यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी यासाठी सर्वांनी देवाचरणी प्रार्थना करावी अशी विनंती विजय विकास सामाजिक संस्थेने केली आहे.