अधिवेशनात दिव्यांग, शेतकऱ्यांच्या प्रश्न मांडणाऱ्या दिव्यांगाचे आधारस्तंभ माजी मंत्री बच्चुभाऊ कडूचे पुनर्वसन करा – चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर
३ डिसेंबर २०२४ दिव्यांग जागतिक दिनी जिल्हाधिकारी नांदेड येथे आक्रोश मोर्चा ने शासनास जागे करणार
नांदेड/प्रतिनिधी,दि.28
उपेक्षित दिव्यांग,वृध्द निराधाराचा साधा निवडणुकीत जाहिरनाम्यात, जाहिर सभेत उल्लेख होत नाहि.तर अधिवेशनात उपेक्षितांचे न्याय हक्कासाठी कोण आवाज ऊठविणार ईश्वराने दिनदुबळ्यासाठी बच्चुभाऊना सद्बुद्धी दिल्यामुळे ईश्लररूपी उपेक्षित दिव्यांग, वृध्द, निराधार, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाघासारखे डरकाळीने फोडीन प्रश्न अधिवेशनात मांडुन दिव्यांगाना न्याय हक्क मिळावा म्हणून देशातील पहिले महाराष्ट्र राज्यात दिव्यांग मंत्रालय निर्मिती करण्यासाठी शासनास भाग पाडणारे दिव्यांगाचे दैवत बच्चु कडु कोणत्याही पक्षात विलीन न होता चार वेळा अपक्ष भरघोस मतानी निवडुन येणारे आज जनतेच्या विकासासाठी रात्रंदिवस मेहनत करणाऱ्यां बच्चुभाऊना निवडणुकीत सामान्य जनता प्रचार करुन भरघोस मतांनी येण्याचा अंदाज असताना त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.
खऱ्या ईश्लररूपी दिव्यांग वृध्द निराधार दिनदुबळ्यासाठी माजी मंत्री बच्चुभाऊ कडु यांचे पुनर्वसन करावे दिव्यांग वृध्द निराधाराच्या अनेक प्रश्नांसाठी दिव्यांग जागतिक दिन 3 डिसेंबर
२०२४जिल्हाधिकारी नांदेड येथे आक्रोश मोर्चा बेरोजगार दिव्यांग कल्याणकृति संघर्ष समिती व दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने मोर्च्याची नेत्रत्व संस्थापक अध्यक्ष राहुल साळवे, संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग वृध्द निराधारानी मोर्च्यात हक्कासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पासुन जिल्हापरिषद नांदेड, महानगरपालिका नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे होत असलेल्या मोर्च्यात सहभागी व्हावे असे आव्हान
संस्थापक अध्यक्ष राहुल साळवे, संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील,राहुल साळवे, सुधाकर पिलगुंडे,ज्ञानेश्वर नवले, राजाभाऊ शेरकुरवार, चांदराव चव्हाण मिंलिद चिगोटे,विद्याधर गिरी,ऊतम चिगोटे,चांदु गोरटकर,उमेश भगत,मगदुम शेख,अनिल रामदिनवार,दिंगबर लोणे इत्यादी कार्यकर्त्यांनी मोर्चात सहभागी होण्याचे आव्हान केले


