खबरदार मुलींना छेडाल तर ! ए.पी.आय.आरती जाधव

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.20
कै बाबुराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालय व रामचंद्र किनगावकर प्राथमिक विद्यालयामध्ये शालेय विद्यार्थ्यांनीसाठी जनजागृती करण्यासाठी कदीम पोलीस स्टेशनच्या ए.पी.आय आरती जाधव यांनी विद्यार्थिनींना छेडणाऱ्या , मुलींचा छळ करणाऱ्या मुलांना सक्त ताकीद दिली.खबरदार जर मुलींना छेडल तर बालगृहात जाल असे त्या म्हणाल्या. शाळेत जातांना किंवा घरी जातांना कोणी पाठलाग करत असेल किंवा टकलावून पाहत असेल तर शिक्षकांकडे किंवा पोलिसांकडे तक्रार करा, मुली पोलीस स्टेशनला येण्यासाठी घाबरतात अजिबात न घाबरता मुलींनी यावे तक्रार करावी. स्व संरक्षणाचे धडे घ्यावे. रोज वर्तमान पत्रे वाचावीत स्वतःला धाडसी बनवावे असे यावेळी त्यांनी संबोधित केले.
यावेळी पोलीस कॉन्स्टेबल राठोड मॅडम यांनी हीच आमची प्रार्थना ही प्रार्थना घेऊन वाईट प्रवृत्ती ने वागू नये मुली ह्या आपल्या बहिणप्रमाणे असतात तसेच दामिनी पथकच्या हेडकॉन्स्टेबल खरजुले मॅडम गायकवाड मॅडम, ज्योती राठोड मॅडम जनजागृती वाहनाचे पोलीस कॉन्स्टेबल इन्चार्ज गौतम बोबडे सर, रामेश्वर देशपांडे उपस्थित होते. तदनंतर जनजागृतीपर विद्यार्थिनींच्या,नारी शक्तीच्या काही चित्रफिती दाखवण्यात आल्या.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी कुलकर्णी यांनी ए.पी.आय. आरती जाधव, दामिनी पथकच्या हेडकॉन्स्टेबल खरजुले मॅडम यांचे अलकनंदा गाडेकर यांनी, गायकवाड मॅडम यांचे नन्नवरे मॅडम यांनी स्वागत केले.रामचंद्र किनगावकर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती. मनीषा देव यांनी ज्योती राठोड यांचे तर अरुणा वाघमारे यांनी खरजुले यांचे स्वागत केले,पोलिस कॉन्स्टेबल गौतम बोबडे यांचे संदीप इंगोले यांनी, रामेश्वर देशपांडे यांची मदन सोजे यांनी, पठाण मॅडम यांचे अनघा जोशी यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री संदीप इंगोले यांनी केले. यावेळी शिक्षक दिनेश राठोड, सुशील म्हस्के, भीमाशंकर कुलकर्णी, राजाराम साबळे तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.


