pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

धनगर आरक्षण रॅलीमुळे 17 जानेवारी रोजी वाहतुक मार्गात बदल

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.16

दि.17 जानेवारी 2026 रोजी रॅली घेऊन अंबड चौफुली येथुन दिपक बोऱ्हाडे हे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातुन आरक्षण मिळण्याकरीता मुंबई येथे जात असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी धनगर समाज मोठ्या प्रमाणावर येणार असल्याने मार्गात अडथळा निर्माण होऊ नये. रस्ता मोकळा रहावा व रस्त्यावर वाहने अभी राहून मार्गात अडथळा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने वाहतुकीचे नियमनासाठी या मार्गावरील वाहतुकीस पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे.

बीड – शहागड अंबड येथील वाहतुक जालना बीड शहागड अंबडकडुन येणारी वाहतुक ही पारनेर फाटा सुखसागर हॉटेल पासुन वळवुन ही किनगाव चौफुली – नानेगाव बदनापुर सेलगाव ग्रेडर टी पाँईट जालनाकडे येईल व ये‍थुन पुढील मार्गाने जाईल.

जालना- शहरातुन अंबड बीडकडे जाणारी वाहतुक जालना अंबड बीडकडे जाणारी वाहतुक ही ग्रेडर टी पाँईंट – भोकरदन नाका या मार्गाने कन्हैयानगर मंठा चौफुली मार्गे रोहणवाडी फाटा येथुन वळवून राणी उंचेगाव – सुतगिरणी घनसावंगी फाटा मार्गे अंबड – बीड- शहागडकडे जाईल.
वरील आदेश दि. 17 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8.00 वाजेपासुन धनगर समाज रॅली जिल्हा हद्दीच्या बाहेर जायेपर्यंत अंमलात राहील. असे आदेश पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी दिले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे