pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी समागम

चित्ररथाचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते उद्घाटन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.19

नांदेड येथे महाराष्ट्र शासनामार्फत येत्या 24 व 25 जानेवारी 2026 रोजी आयोजित हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाची जिल्ह्यातील शीख, सिकलीगर, बंजारा,लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासीन आणि वारकरी संप्रदायातील भगत नामदेव या नऊ समाजासह इतरही भाविकांमध्ये व्यापक प्रमाणावर जनजागृती व्हावी, यासाठी ‘हिंद-दी-चादर’ चित्ररथाचे (दि. 18 रोजी) मंगळ बाजार येथील गुरुद्वारा  परिसरात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जगदीश सेवाराम, डॉ. आर.डी सचदेव, बाबाजी सर्वणसिंग, राजेश जांगडे, हितेश जोशी, गुलाब राठोड, श्यामजी सारस्वत, मोहित काडा, पंकज धनकाणी, करण सिंग भोंड, सिकंदर सिंग टाक, हरिनाम सिंग चव्हाण, संतोष सिंग कलाणी, ध्यानु सिंग टाक, ज्वाला सिंग कलाणी, रणजीत सिंग कलाणी, लल्लू सिंग कलाणी, जगदीश सुरी, सोनुसिंग रिहाण, दर्पण सिंग सुखमणी, बलजीत सिंग ढिल्लो, दिप सिंग कलाणी, जितूभाऊ गेही यांच्यासह समाजबांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, हा मुख्य उद्देश आहे. चित्ररथ जिल्ह्यातील वस्ती, तांड्यावर जावून ‘हिंद दी चादर’ या विशेष कार्यक्रमासाठी जास्तीत-जास्त भाविकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे