pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

उरण मध्ये चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समितीच्या सदस्य पदासाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान तर निकाल ७ फेब्रुवारीला.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.17

महाराष्ट्रातील महानगरपालिकांचे निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणूक होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका त्वरित पार पडणार असून जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक एकाच दिवशी म्हणजेच ५ फेब्रुवारी २०२६ रोजी तर ७ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीचा एकत्रित निकाल लागणार आहे. उरण तालुक्यात चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती सदस्य पदासाठी निवडणूक होणार आहे. दिनांक १६ जानेवारी २०२६ पासून उमेदवारी अर्ज भरायला सुद्धा सुरवात झाली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहेत.

एकूण जिल्हा परिषद व त्यांचे आरक्षण
१)नवघर – सर्वसाधारण स्त्री
२)जासई – नागरिकांचा मागस प्रवर्ग (ना.मा.प्र )
३)चाणजे – सर्वसाधारण स्त्री
४)चिरनेर – नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र)

पंचायत समिती व त्यांचे आरक्षण
१)नवघर- नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र)
२)भेंडखळ -सर्वसाधारण
३)जासई -सर्वसाधारण स्त्री
४)चिर्ले -नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री (ना. मा. प्र. स्त्री )
५)केगाव -सर्वसाधारण
६)चाणजे – सर्वसाधारण
७)चिरनेर -सर्वसाधारण स्त्री
८)आवरे – सर्वसाधारण स्त्री

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे