pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

चैतन्यसाधना रिसर्च फाउंडेशनकडून डॉ. सोमनाथ जईद यांना उत्कृष्ट कार्याबद्दल सेवा पुरस्कार

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.20

महाराष्ट्रात होमिओपॅथी वैद्यक क्षेत्रात उल्लेखनीय व सातत्यपूर्ण रुग्णसेवा केल्याबद्दल डॉ. सोमनाथ जईद (MD – होमिओपॅथी) यांना चैतन्य साधना रिसर्च फाउंडेशनच्या वतीने सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार चैतन्य साधना रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.प्रमोद कुमावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ प्रकाश मांटे उपस्थित होते. रुग्णसेवेत दिलेले योगदान, नैतिक उपचार पद्धती आणि दीर्घकालीन आजारांवरील प्रभावी होमिओपॅथिक उपचार यांची दखल घेऊन हा सेवा पुरस्कार देण्यात आला.

या प्रसंगी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. पुरस्कार स्वीकारताना डॉ. सोमनाथ जईद यांनी हा सन्मान आपल्या रुग्णांना, सहकाऱ्यांना व मार्गदर्शकांना समर्पित करत, भविष्यातही निःस्वार्थ भावनेने समाजोपयोगी वैद्यकीय सेवा देण्याचा संकल्प व्यक्त केला.

डॉ. सोमनाथ जईद हे लाईफ केअर होमिओपॅथी क्लिनिक येथे कार्यरत असून, त्यांच्या या सन्मानामुळे होमिओपॅथी क्षेत्रात मोलाची भर पडली आहे असे प्रतिपादन डॉ प्रमोद कुमावत यांनी केले आहे.

लाईफ केअर होमिओपॅथी क्लिनिक जालना येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे