जय महाराष्ट्र कामगार सेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या शुभहस्ते संपन्न…

रयतनामा पिंपरी चिंचवड दि. 15 : जय महाराष्ट्र कामगार सेना महाराष्ट्र राज्य संघटनेचे राज्य उपाध्यक्ष हर्षाभाऊ महाडिक यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या हस्ते फीत कापून या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय महाराष्ट्र कामगार सेना संघटनेचे संस्थापक तथा अध्यक्ष मिलिंद सोनवणे उपस्थित होते.
या कार्यक्रमाला सामाजिक, राजकीय तसेच कामगार क्षेत्रातील अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. उद्घाटन प्रसंगी बोलताना विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी जय महाराष्ट्र कामगार सेना संघटनेच्या कार्याचे कौतुक करत बांधकाम मजुरांसाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “बांधकाम क्षेत्रातील मजुरांना शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी संघटनेने सक्रिय भूमिका बजावावी. मजुरांच्या अडचणी सोडवून त्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यासाठी मी सदैव तत्पर राहील.”
हर्षाभाऊ महाडिक यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यालयास भेट देत शुभेच्छांचा वर्षाव केला.
कार्यक्रमादरम्यान संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत कामगारांच्या प्रश्नांवर संघटनेने अधिक प्रभावीपणे काम करावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
यावेळी संघटनेचे सरचिटणीस महेंद्र निशिगंध, कार्याध्यक्ष मनोज क्षीरसागर तसेच आरपीआयचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, बहुजन विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष संजय (नाना) धुतडमल, बहुजन विकास आघाडीचे मार्गदर्शक नानासाहेब कांबळे, आरपीआय पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष विलास कांबळे, ज्येष्ठ नेते के. एम. बुकतर, सिद्धार्थ चव्हाण, पँथर दत्ताभाऊ गायकवाड, दत्ता कांबळे, दयानंद बनसोडे, कैलास कसबे, मोहन शिंदे, लक्कीचंद आवळे, घनश्याम महाडिक, सुरज शिंदे यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. यावेळी नवनाथ गायकवाड यांची जय महाराष्ट्र कामगार सेना पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच सोमनाथ फाकटकर यांची जुन्नर, आंबेगाव, अकोले आणि संगमनेर तालुक्यांसाठी जय महाराष्ट्र कामगार सेनेच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमामुळे जय महाराष्ट्र कामगार सेना संघटनेच्या कामगार हिताच्या चळवळीला अधिक बळ मिळणार असल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली. विशेषतः बांधकाम मजुरांचे प्रश्न, शासनाच्या योजनांचा लाभ, कामगारांचे हक्क आणि संघटनात्मक मजबुती यासाठी संघटना आगामी काळात अधिक जोमाने कार्यरत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला
