pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

मराठवाडा पदवीधर मतदार संघात एक लाख मतदार नोंदणीचे मराठवाडा शिक्षक संघाचे उदिष्ट

नोंदणीचे मराठवाडा शिक्षक संघाचे उदिष्ट पदवीधारकांनी मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी करावी - सुर्यकांत विश्वासराव, राजकुमार कदम

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.13

मराठवाडा विभाग पदवीधर मतदारसंघाच्या आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदारांची नाव नोंदणीची प्रक्रिया सुरु आसून मराठवाडा शिक्षक संघ पुर्ण ताकतीने या निवडणुकीत उतरणार आसून एक लाख पदवीधर मतदारांची नाव नोंदणी करण्याचे उदिष्ट पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समोर ठेवले आहे. त्यासाठी मराठवाडा विभागातील पदवीधर आसलेले शिक्षक, प्राध्यापका सह इतर सर्व क्षेत्रात कार्यरत आसलेल्या पदवीधर कर्मचारी व पदविधारक बांधवाची मतदानासाठी नाव नोंदणी करून घ्यावी व पदविधारकांनी सुध्दा मोठ्या प्रमाणावर नाव नोंदणी करावी असे अवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव व सरचिटणीस राजकुमार कदम यांनी केले आहे.
याबाबत मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य बंडू अघाव यांनी दिलेली माहिती असी की,सदरील होणाऱ्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विचार विनिमय करण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या केंद्रीय कार्यकारणीची व कार्यकर्त्यांची नुकतीच व्यापक स्वरूपात ऑनलाइन बैठक शिक्षक संघाचे मार्गदर्शक पी.एस.घाडगे व व्ही.जी.पवार यांच्या उपस्थितीत व अध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसी संवाद साधताना सुर्यकांत विश्वासराव व सरचिटणीस राजकुमार कदम यांनी वरील उदिष्ट समोर ठेवून मोठ्या प्रमाणावर नाव नोंदणी करून घेण्याचे अवाहन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.
नाव नोंदणी दि.१ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत करून घेण्यात येत आहे. त्यासाठी मतदार हा १ नोव्हेंबर २०२२ पुर्वीचा पदवीधर आसला पाहिजे. तहसील कार्यालयातून नमुना अर्ज क्र.१८ घ्यावयचा आहे. व तो पुर्ण माहिती भरून त्यासोबत कोणत्याही विद्यापिठाच्या पदवीचे प्रमाणपत्र अथवा शेवटच्या वर्षाच्या गुणपत्रकाची सत्यप्रत, आधार कार्ड अथवा मतदार ओळखपत्राची झेरॉक्स जोडावी व अर्जावर पासपोर्ट चिटकवावा. व सदरील अर्ज मराठवाडा शिक्षक संघाच्या पदाधिकारी यांच्याकडे अथवा तहसील कार्यालयात स्वतः नेहुन द्यावा व त्याची पोहच घ्यावी.असे अघाव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
प्रसिध्दी पत्रकावर मराठवाडा शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष ए.बी.औताडे,उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे,गुट्टे एस.जी.,सहसचिव पवार टी.जी.,माळी एन.जी.,रेखा साळुंखे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अशोक मस्कले,मधुकर जोंधळे, रातोळे जी.जी.,कुरेशी ए.ए.,राठोड पी.आर.,सुर्यवंशी आर,एन.,कदम व्ह.जी.,कौसल्ये जी.पी.,पाटोदेकर ए.डी.,सोळंके एन.टी.,वऱ्हाड बी.ए.,तिर्थकर एस.एस.,जमादार एफ.बी.,पाटील पी.एस.यांच्यासह जिल्हाध्यक्ष कालीदास धपाटे, व्यंकटराव चिलवरवार,बसवेश्वर माने,शेरखाने जे.एस.,रमेश आंधळे,यशवंत मकरंद, हरिभाऊ भडके,हाळदे के.एम. जिल्हा सचिव गणेश आजबे, रविंद्र वाकोडे, चंद्रकांत चव्हाण, जी.व्ही.माने,विक्रम मायाचारी,संजय येळवंते,कदम एन.टी.,ढेंगळे व्ही.एस.,दिनेश पाटील आदिंची नावे आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे