pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

मूर्तिजापूर सेवा सहकारी सोसायटीवर सहकारचा झेंडा:पॅनलचे सर्व १३ उमेदवार बहुमताने झाले विजयी

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.1

मोर्शी : तिवसा तालुक्यातील मूर्तिजापर तरोडा येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक २७ एप्रिलला पार पडली. या निवडणुकीत सहकार पॅनलचे सर्व १३ ही उमेदवार बहुमताने विजयी झाले. या निवडणुकीत शेतकरी पॅनल व लोकशक्ती पॅनलचे एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही.सहकार पॅनलचे विजयी झालेले उमेदवार यामध्ये कर्जदार गटातून राजेश वेरूळकर, सुधीर बोके, गणेश कोल्हे, नरेंद्र वेरुळकर, राजेंद्र शिर्के, प्रकाश नेवारे, अतुल वेरूळकर, योगेश वेरूळकर, महिला राखीव उमेदवार रिना वेरुळकर, ललिता बेलमकर इतर मागासवर्गीय उमेदवार गजानन टाके, विमुक्त जाती जमाती भटक्या उमेदवार गणेश उईके, अनुसूचित जाती- जमाती उमेदवार प्रमोद मेश्राम यांचा समावेश आहे. या सेवा सहकारी सोसायटीत येथील राजेश उर्फ राजू सुधाकर वेरूळकर यांचे सहकार पॅनल असून ते कृषी उत्पन्न बाजार समिती तिवसाचे संचालक आहेत. तसेच विद्यमान सोसायटीचे अध्यक्ष होते. त्यांच्या विरोधात शेतकरी पॅनल तर लोकशक्ती पॅनल या दोन्ही पॅनलचे एकही उमेदवार निवडून आले नाही. या निवडणुकीत सर्वश्री सहकार पॅनलचे वर्चस्व राहून पुन्हा सत्ता काबीज केली, याबद्दल मूर्तिजापूरवासीयांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे