स्वराज्य संस्थापक अध्यक्ष श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या निवासस्थानी ऊत्साहात संपन्न
नांदेड/ प्रतिनिधी,दि 19
नांदेड: आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र प्रसिध्दी प्रमुख तथा दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष, व,लाईव्ह चॉनलचे संपादक चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या निवासस्थानी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दि.१९ फेब्रुवारी २०२५ रोजी अति उत्साहात संपन्न झाली.
आज शिवजयंती. 19 फेब्रुवारी… इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरांनी लिहिलेला हा दिवस प्रत्येकाच्या मनावर कायमस्वरूपी कोरला गेला आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्ववान वीरपुत्र लाभला. या दिवशी शिवनेरीवर जिजाऊंच्या पोटी शूरवीर जन्माला आला. ज्याने आपल्या अजोड पराक्रमाने मूठभर मावळ्यांच्या साथीनं रयतेचं राज्य निर्माण केलं. अन्याय सहन करायचा नाही आणि कुणावरही अन्याय होऊ द्यायचा नाही, हे व्रत त्यांनी प्राणपणान जपलं. ओल्या झाडाची फांदी तोडायची नाही. कुणाच्याही शेतातलं पीक खुडायचं नाही. आया बहिणींना छळायचं नाही. मुलीबाळींना छेडायचं नाही… मग ती स्त्री दुश्मनाच्या घरातली असली तरी तिला माना-सन्मानानं वागवायचं… ही होती महाराजांची शिकवण. विश्ववंदनीय, महापराक्रमी रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला मा.हभप गणपतराव वडजे महाराज, चंपतराव डाकोरे, जगदिश माने, विश्वजित माने, योगिराज शिंदे,बालाप्रसाद डाकोरे, उमाकांत देशमुख, साईप्रसाद डाकोरे, स्वातीताई मुक्कामावर,मयुरी मटके,
ऊषाबाई वडजे,सौ.सारजाबाई डाकोरे, शकुंतलाबाई वडजे, सिंधुताई बागडेबाई शोभाबाई देशमुख, इत्यादी उपस्थित होते
असे प्रसिध्दी दिली


