pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

लायन्स क्लब ऑफ उरण अध्यक्ष लायन प्रा डॉ साहेबराव ओहोळ यांचा शपथविधी सोहळा संपन्न

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.6

लायनेस्टिक वर्ष २०२५-२०२६ साठी उरण क्लबच्या अध्यक्ष पदाचा शपथविधी दि ५ जुलै २०२५ रोजी राम रतन शामियाना कामठा रोड उरण येथे संपन्न झाला. शपथ देण्याचे काम प्रमुख पाहुणे एम जे एफ लायन खेमंत टेलर यांनी केले. सोबतच सचिव म्हणून लायन संध्याराणी ओहोळ, खजिनदार लायन डॉ अमोल गिरी तर प्रथम उपाध्यक्ष म्हणून लायन संदीप गायकवाड यांचाही शपथविधी पार पडला.

दुसरे पाहुणे पी एम जे एफ लायन अनुप थारवाणी यांनी नवीन ५ सभासदांचा लायन्स क्लब उरणचे सभासद म्हणून प्रवेश सोहळा संपन्न केला. सदर कार्यक्रमाला विभाग चेअरमन लायन दीपक पाटील, झोन चेअरमन लायन अंशू पॉल मॅडम उपस्थित होते. तसेच ज़िल्हा कार्यकारिणीमधील लायन सुयोग पेंडसे, लायन संजय गोडसे, लायन मिलिंद पाटील इ. उपस्थित होते.या कार्यक्रम प्रसंगी लायन क्लब उरणचे चार्टर मेंबर लायन चंद्रकांत ठक्कर, बी.ओ.डी.ला. सदानंद गायकवाड, ला संजीव अग्रवाल, ला.डॉ. प्रीती गाडे, ला. डॉ संतोष गाडे, ला प्रकाश नाईक, ला. नरेंद्र ठाकूर, ला. निलिमा नारखेडे, ला. ज्ञानेश्वर कोठावदे व इतर सभासद उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे