pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

बँकांनी ग्राहकांच्या तक्रारीची  गंभीरतेने दखल घ्यावी अन्यथा रिझर्व बँक कारवाईचा बडगा उगारणार, जनजागृती कार्यक्रम आणि बँकिंग तक्रार निवारण कार्यशाळेचे आयोजन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनिधी, दि.2
रिझर्व बँक  व्यापारी, उद्योजक,शेतकरी आणि सर्व सामान्य माणसाच्या आर्थिक समृद्धी म्हणजेच बॅकांची प्रगती आहे. रोजगार व विकासाच्या दृष्टीने  बँकेचे वरील घटक महत्वाचे आहेत. सर्व बँकांनी त्यांच्या सर्व तक्रारींची दखल गंभीरतेने घेऊन  सन्मानपूर्वक निपटारा करावा. बँकांनी आपल्या ग्राहकाच्या समस्या सकारात्मकपणे सोडवल्या नाही तर बँकांवर रिझर्व बँकेकडून बँकावर कारवाई करण्याची वेळ येऊ शकते, अशी तंबी रिझर्व बँकेचे अधिकारी आकाश काबरा यांनी येथे नुकतीच दिली.
जिल्हा व्यापारी महासंघ आणि भारतीय रिझर्व्ह बँक लोकपाल मुंबई, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने केन्द्र सरकारच्या लोकपाल योजना २०२१ वर आधारित जनजागृती कार्यक्रम आणि बँकिंग तक्रार निवारण कार्यशाळेचे आयोजन हॉटेल विजय विलास येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. काबरा म्हणाले की, व्यापारी, उद्योगजक आणि सर्वसामान्य ग्राहकांना संबंधित बॅन्केच्या संदर्भात काही आक्षेप अथवा तक्रार असेल आणि स्थानिक पातळीवर सुटत नसेल तर त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या तक्रार निवारण पोर्टलवर बँकेच्या ग्राहकांनी तक्रार दाखल करावी. तीस दिवसांच्या अंतरात या तक्रारीची दखल घेतली जाईल. टोलफ्री क्रमांकावरही तक्रारी दाखल करता येईल. ते म्हणाले की, बँका ज्या वित्तीय सेवा आणि कर्ज  उपलब्ध करून देतात त्यांचे शुल्क,व्याज त्या संबंधित ग्राहकाकडून वसूल करतात. बॅन्क व्यवस्थापकांनी त्यांच्या सर्व ग्राहकांना वेळ दिलाच पाहिजे त्यांच्या अडचणी स्थानिक पातळीवर सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. रिझर्व्ह बँकेचे नियम ग्राहकांच्या सोयीसाठी अतिशय स्पष्ट आहेत. पारदर्शक आर्थिक व्यवहार हे बॅन्क आणि ग्राहक दोघांच्या प्रगतीसाठी गरजेचे असल्याचे आरबीआयचे क्षत्रिय अधिकारी श्रीहरी त्रिपाठी यांनी सांगितले आणि रिझर्व्ह बँकेच्या तक्रार निवारण पोर्टलवर तक्रार कशी करायची याचे प्रात्यक्षिक त्यांनी सादर केले.
शहरातील विविध बॅन्कांचे व्यवस्थापक, व्यापारी, उद्योजक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्स चे महासचिव शाम लोया जालना जिला व्यापारी महासंघ चे अध्यक्ष विनीत साहनी रिजर्व बैंक ऑफ इंडियाचे अधिकारी आकाश काबरा स्टेट बैंक ऑफ इंडिया रीजनल मेंजर चक्रवर्ती लीड डिस्ट्रिक्ट मैनेजर मंगेश केदार लघु उद्योग भारतीय अध्यक्ष पंकज कासलीवाल क्रेडाई अध्यक्ष डॉ विट्ठल पवार जालना पीपल्स कोऑपरेटिव बैंक के अध्यक्ष संजय मुथा जालना मर्चेंट बैंक के अध्यक्ष सीए गोपाल अग्रवाल व्यापारी महासंघ महासचिव संजय दाढ़ बंकट खंडेलवाल दिलीप शाह विजय राठी राजेश कामड़ विनोद कुमावत मनोज पाचफुले विनोद पवार लक्ष्मीनारायण मानधना इंडस्ट्रियल कमलबाबू झुनझुनवाला सुनिलभाई रायथठ्ठा महेश नाथानी अंकुशजी राऊत हेमंत ठक्कर  सुदर्शन बाँगड़ कमलेश कुकड़ेजा अभय कुलकर्णी राजूसेठ जैन राम भंडारी हितेन्द्र त्रिवेदीनीलेश शाह पीनल शाह विजय अंभोरे दिलीप अग्रवाल  योगेश ठक्कर जितेन्द्र पाटनी व सर्व एसोसिएशन चे व्यापारी एसबीआई बैंक यूनियन बैंक सेंट्रल बैंक ऑफ इंडिया महाराष्ट्र बैंक बैंक ऑफ इंडिया पंजाब बैंक बड़ौदा बैंक एचडीएफसी बैंक। जालना पीपुल्स बैंक मर्चेंट बैंकचे अधिकारी उपस्थित होते.
चौकट
कुठल्याही ॲप्स व वेबसाईटला परवानगी देऊ नये
सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून  यात ग्राहकाची आर्थिक फसवणूक होत आहे तर ग्राहकांनी सावधान राहून ऑनलाइन  कुठल्याही ॲप्स व वेबसाईटला परवानगी देऊ नये. मोठ्या प्रमाणात बोगस कागदपत्रांच्या आधारे फसवणूक होत आहे. त्यापासून सावधानता बाळगा. मोबाईल ईमेलवर अनोळखी व्यक्तीशी संपर्क करू नये आर्थिक व्यवहार करताना अत्यंत काळजीपूर्वक करण्याचे आवाहन एसबीआय चे क्षेत्रिय व्यवस्थापक कौस्तव चक्रवर्ती यांनी केले.  मल्टीस्टेट सोसायटीचे व्यवहार आरबीआयच्या नियंत्रणात नसल्याने तिथे फसवणूक झाल्याच्या तक्रारीचे निवारण करता येत नाहीत पण नागरी सहकारी बँका  व शेडूल्ड बँका यांच्यावर रिझर्व बँकेचे नियंत्रण असते असे ते म्हणाले.
चौकट
बॅँकांच्या अधिकाऱ्यांनी मांडल्या समस्या
शेतकर्यांचे कर्ज प्रकरणे बॅन्का करत नाहीत, उद्योग व्यवसायिकांना खूप त्रास होतो, अशी तक्रार जेष्ठ व्यापारी विजय राठी यांनी केली. एचडीएफसी बॅन्केच्या स्थानिक पातळीवरील तक्रारी सावजी यांनी मांडल्या. सायबर आर्थिक फसवणुकीच्या संदर्भात प्रियदर्शनी बॅन्केचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचीन वाणी यांनी रिझर्व्ह बँकेने उपाय करावेत अशी मागणी केली. बिल्डर्स व्यवसायीकांना कर्ज द्यावे असे क्रेडाईचे अध्यक्ष डॉ विठ्ठल पवार म्हणाले. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनीत सहाणी,कर सल्लागार गोपाल अग्रवाल यांनी अतिवृष्टी झाल्याने ओला दुष्काळ पडला आहे याचा विचार करावा असे आवाहन केले.
प्रास्ताविक मराठवाडा चेंबरचे महासचिव शाम लोया यांनी केले.व्यासपीठावर बंकटलाल खंडेलवाल, महासंघाचे महासचिव संजय दाड, दिलीप भाई शहा, संजय मुथा, लिड बॅन्क व्यवस्थापक महेश केदार, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष पंकज कासलीवाल उपस्थित होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे