pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा केंद्र  परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू 

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.22

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 10 वी 12 वी परीक्षा दिनांक 15 फेब्रुवारी ते 2 एप्रिल 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, नवी दिल्ली यांनी जालना जिल्ह्यातील निश्चित केलेल्या 4 परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात आले आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी सोहम वायाळ यांनी जारी केले आहेत.
परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्रावर कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी अध्यक्ष, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, नवी दिल्ली यांनी जालना जिल्हयात निश्चित केलेल्या 1) गोल्डन जुबली स्कुल, संतोषी माता मंदीर देऊळगाव राजा रोड जालना 2) पोद्दार इंटरनॅशनल स्कुल, संतोषी माता मंदीर देऊळगाव राजा रोड, जालना 3) जवाहर नवोदय विद्यालय आंबा परतूर, 4) सेंट मेरीस हायस्कुल, देऊळगाव राजा रोड, जालना या चार परीक्षा केंद्र परिसरात परीक्षा चालु असतांना काही पालक, परीक्षा न देणारे विद्यार्थी उपद्रव करीत असतात. परीक्षार्थ्यांना नकला पुरविणे व परीक्षा केंद्राच्या परिसरात घुटमळत राहणे त्यांच्या या कृतीमुळे परीक्षा केंद्राच्या परिसरात अशांतता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, वरील परीक्षा कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत वरील केंद्राच्या 100 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणे कामी प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणुन फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करणे आवश्यक आहे.
या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी नोटीस देण्यास पुरेसा कालावधी नसल्याने व परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे दृष्टीने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार सदर आदेश एकतर्फी काढण्यात येत आहे. सदर आदेशाची प्रसिध्दी पोलीस अधिक्षक, जालना यांनी ध्वनिक्षेपकाद्वारे करावी. सदरील आदेश वरील परीक्षा कालावधीत सकाळी 8 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत अंमलात राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे