pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

आम्हाला अन्न हवे, तंबाखू नाही – मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना जागतिक तंबाखू विरोधी दिन विविध उपक्रमांनी साजरा

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.31

जागतिक तंबाखू विरोधी दिना निमित्त भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय  कार्यालय-औरंगाबाद आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषद, जालना, नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य व नेहरू युवा केन्द्र व धरतीधन ग्राम विकास संस्था, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद, जालना येथे प्रभात फेरी, सायकल रॅली, पथनाट्य आणि शाहिरी पोवाडा, मार्गदर्शन, चित्रकला, प्रश्नमंजुषा व तंबाखू विरोधी शपथ कार्यक्रम संपन्न  झाला.
कार्यक्रमाचे उदघाट्न औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केले. यावेळी जालना जिल्हा परिषद परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी राजा सोलंके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी. एम. कांबळे, शिक्षण अधिकारी कैलास दातखिळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी कोमल कोरे, कार्यकारी अभियंता मंजूषा राजहंस, धरतीधन ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष मिलिंद सावंत, तेजस जनविकास संस्थेचे शिवाजी तायडे आदी उपस्थित होते.
विकास मीना व सर्व मान्यवरांनी प्रभात फेरी व सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवून कार्यक्रमाचे उदघाटन केले. वर्षा मीना यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी ह्या वर्षीची थीम “आम्हाला अन्न हवे, तंबाखू नाही” असे सर्वांना संदेश दिला.  बी. एस. सय्यद व मिलिंद सावंत यांनी यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप पवार यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतली व आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्र तंबाखू मुक्तीची शपथ घेतली व यावेळी जिल्हा परिषदेचा परिसर तंबाखू मुक्तीच्या घोषणांनी दणाणला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्र शासनाच्या पंजीकृत शिवदर्शन सांस्कृतिक शाहीर संच, छत्रपती संभाजीनगर तर्फे पोवाड्याच्या माध्यमातून तसेच जालन्याच्या जिल्हा परिषदेच्या कर्मचारी व अधिकारी यांनी तंबाखू जनजागृतीपर व प्रोत्साहन पर सांस्कृतिक (पथनाटय) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात चित्रकला व प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. जिल्हा परिषद प्रांगणात तंबाखू विरोधी शपथ पर सेल्फी बूथ व signature campaign बोर्ड देखिल लावण्यात आला आहे. चमन चौक, नगर पालिका, जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा परिषद येथे रॅलीच्या रस्त्यात तंबाखू विरोधी मोठे बैनर लावण्यात आले आहेत तसेच 01 चित्रप्रदर्शन रिक्षा ऑडीओ च्या माध्यमातून संपूर्ण जालना शहरात तंबाखू विरोधी प्रचार करणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-औरंगाबाद सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार, सहकारी प्रिती पवार, शरद सदिगले व प्रभात कुमार, जिल्हा सल्लागार, NTCP, डॉ. संदीप गोरे, सहकारी सोनाजी भुतेकर, सुनंदा कोरडे आदींनी परीश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे