pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

दिव्यांग व्यक्तींना ई व्हेईकलसाठी अर्ज करण्याचे आवाहन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 27 

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने सन 2024-25 मध्ये हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना लागू करण्यात आली आहे.

योजनेचे उद्देश दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी- सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार/कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हे आहे.

योजनेचा लाभ राज्यातील गरजु दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदारांनी नाव नोंदणीसाठी पोर्टल दि. 22 जानेवारी 2025 रोजी प्रक्षेपित करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  https://register.mshfdc.co.in  ही लिंक उपलब्ध आहे. या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी. दि. 6 फेब्रुवारी 2025 सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींना घेण्याचे आवाहन महाराष्ट्र्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या. चे  जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे