पालकमंत्री अतुल सावे यांनी केली जिल्हा क्रीडा संकुलातील कामांची पाहणी
जालना/प्रतिनिधी,दि.15
राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलातील लॉन टेनिस मैदानासह इतर कामांची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. तसेच जिल्हा क्रीडा संकुलावर करण्यात येणाऱ्या मैदानाची कामे गुणवत्तापुर्ण तसेच लवकरात लवकर पूर्ण करावेत, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पालकमंत्री अतुल सावे यांना कामांच्या प्रगतीबद्दल माहिती दिली. यावेळी आमदार नारायण कुचे, , जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता स्मिता पवार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.


