राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मोर्चासह धरणे आंदोलनाने दणाणले जाफराबाद शहर
जाफराबाद/विशाल देशमुख,दि 31
टेंभुर्णी, कुंभारझरी आणि जाफराबाद मंडळ ओल्या दुष्काळात समाविष्ट करण्याची प्रमुख मागणी*. जाफराबाद प्रतिनिधी. जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी जाफराबाद आणि कुंभारझरी हे तीन महसूल मंडळ ओल्या दुष्काळाच्या यादीत समाविष्ट न करण्यात आल्याने दुष्काळाची यादीत समावेश करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी ता.३१काढण्यात आलेल्या मोर्चांनी आणि धरणे आंदोलनाने जाफराबाद शहर दणाणले.जाफराबाद तालुक्यात सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.मात्र शासनाने अतिवृष्टी ग्रस्त आणि ओल्या दुष्काळाच्या यादीतून जाफराबाद,टेंभुर्णी आणि कुंभारझरी ही तीन महसूल मंडळ वगळल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाफराबाद तालुका शाखेने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित केले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत पायी मोर्चाने जाऊन तहसीलच्या प्रांगणात धरणे आंदोलन करण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार चंद्रकांत दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जाफराबाद तालुका अध्यक्ष रामधन कळंबे यांनी केले. मोर्चामध्ये सहभागी शेतकऱ्यांनी कापसाच्या वाती झालेल्या टोपल्या , कोंब आलेल्या मका आणून लक्ष वेधले.जाहीर करा जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांचा दिवाळ शासन म्हणत घ्या केळं अशा घोषणा देत या आशयाचे फलक हातात घेऊन शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.*याविषयी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की वगळलेल्या तीनही मंडळांचा समावेश ओल्या दुष्काळात करण्यात यावा, शेतकऱ्यांच्या खात्यावर आर्थिक मदत वर्ग करण्यात यावी, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी बँकांनी लावलेला होल्ड हटविण्यात यावा, शॉट सर्किट मुळे उसाचे नुकसान झालेले शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी यासह विविध मागण्या या निवेदनातून करण्यात आलेल्या आहेत*यावेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे, तालुकाध्यक्ष रामधन कळंबे, रमेश सपकाळ, एकनाथ शेवत्रे, साबेद चाऊस, संजय लहाने, जनार्दन झोरे, रघुनाथ पंडित, शेख मुजीब, गणेश बापू चव्हाण, विनोद खेडेकर, ॲड. रामकृष्ण बनकर, नितीन शिवणकर, ॲड. विष्णु शिंदे, फहीमखा पठाण, एल.बी.शिंदे, शेख सऊद, गजानन लोखंडे, प्रभाकर अवकाळे, अमोल शेळके, गुड्डू मघाडे, बाबासाहेब जाधव, ज्ञानेश्वर शिंदे,राजू करवंदे, विठ्ठल गोरे, राजू सोनूने, शंकर चव्हाण, विनायक पंडित, राजू जाधव, प्रभाकर गायकवाड, रामदास जाधव, संतोष अंभोरे, कौतिकराव राऊत, योगेश सवडे, प्रकाश राऊत, भगवान भोपळे, पांडुरंग भोपळे, शेख गफ्फार, कैलास गाढे, रमेश चव्हाण, गंजीधर चव्हाण, शारेक सिद्दिकी,अनिल शेजुळ,तुकाराम सोनसाळे ,विठ्ठल जोशी,लक्ष्मण धारे, बाळु देशमुख, राजू बोराडे, उत्तम उगले, शंकर गायके, ऋषी शेळके,बालाजी शेळके, रमेश चव्हाण, प्रल्हाद कळंबे,अंकुश कळंबे, बालाजी शेळके यांच्यासह जाफराबाद तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


