pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

मंगेश वाणी यांची वाणी समाज संघटनाच्या तालुका उपाअध्यक्ष पदी निवड.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/ सुनिल भाले,दि.7

टेंभुर्णी येथील वाणी समाजाचे तरुण  नेतृत्व मंगेश वाणी यांच्या वर विश्वास टाकत समाज्याच्या अध्यक्ष पदाची धुरा दिली. अखिल भारतीय जाई वाणी समाज संघटनेच्या वतीने दिनांक 04 एप्रिल रोजी बाभुळगाव तालुका भोकरदन येथे वाणी समाज संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली यावेळी म.रा.वाणी समाज संघटनेचे अध्यक्ष श्री प्रभाकर दिवटे तसेच वाणी समाज जालना जिल्हा अध्यक्ष श्री महेश महाजन यांच्या उपस्थितीत जाफ्राबाद तालुका वाणी समाज संघटना कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यावेळी श्री कैलास खंदाडे यांची जाफ्राबाद तालुका अध्यक्ष पदी तर श्री मंगेश वाणी यांची जाफ्राबाद तालुका उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल टेंभूर्णी येथील वाणी समाजातर्फे श्री योगेश गडकर, अविनाश देशमाने, मनोज पंडीत, राजेंद्र पंडीत, नारायण देशमाने, मुकुंद औटी, सुरेश औटी, मदन औटी यांनी शुभेच्छा दिल्या असून, व्यापारी संघटनेतर्फे श्री मंगेश वाणी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी व्यापारी महासंघाचे जिल्हा सदस्य अलकेश सोमाणी ,संजय बोडखे, सचिन गायमुखे, संजय राऊत, अतूल बुजाडे, गजानन उखर्डे उपस्थित होते.

4/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे