pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

आम्ही वारकरी परिवार सेवा भावी संस्था शाखा इस्लापुर ता. किनवट शाखा बोर्डाचे अनावरण तालुकास्तरीय पदाधिकारी नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमास ऊपस्थित राहाण्याचे ता.अध्यक्ष कसरे यांचे आवाहन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.7

इस्लापुर ता. किनवट येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य शाखा बोर्डाचे अनावरण व तालुक्यातील अनेक शाखा, कार्यकारिणीची निवड व नियुक्तीपत्र वितरण सोहळा दि.10 मार्च 2024रोजी सकाळी 11 वाजता मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात, नामघोषात बोर्डाचे ऊदघाटन संस्थापक अध्यक्ष हभप गुरूवर्य राम महाराज पांगरेकर ,अनेक प्रमुख मान्यवर संस्थेचे मार्गदर्शक रावसाहेब पाटील शिराळे, संस्थेचे उपाध्यक्ष गंगाधर हंबर्डे,सचिव व्यंकटराव जाधव माळकौठेकर, सहसचिव प्रभाकरराव पा. पुयड कोषाध्यक्ष शिवाजी मदमवाड, जिल्हाप्रसिध्दि प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल श्री प्रवीण रौतुलवाड, श्री गुलाबराव पा.उबाळे, श्री भगवान पा. रहाटीकर,बालाजी पवार,इत्यादी मान्यवरांच्या गावकऱ्यांच्या, परिसरातील भाविक भक्ताच्या ऊपस्थित बोर्डाचे अनावरन, नियुक्ती वितरण सोहळाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी किनवट तालुक्यातील सर्व आघाडीतील कार्यकारणी व शाखा कार्यकारणी पदाधिकारी याना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व आघाडी मुख्य आघाडी, प्रसिद्धी पत्रकार आघाडी, महिलाआघाडी, युवक आघाडी, साधुसंत,भाविक भक्त मंडळी उपस्थिती राहुन
हा कार्यक्रम यशस्वि करावा असे अव्हाहन आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे किनवट तालुका अध्यक्ष, विवेकानंद कसरे उपाध्यक्ष गोपिनाथ मोतेवार सचिव विठ्ठलराव म़तेवार,सहसचिव आस्तिक सावंत, कार्याध्यक्ष, लक्ष्मणराव मांगीरवाड, ओमप्रकाश निलमवार
शाखा अध्यक्ष सर्व पदाधिकारी ईत्यादिने केले आहे.मोठ्या प्रमाणात भाविक भक्त पदाधिकारी सहभागी व्हावे असे पत्रक जिल्हाप्रसिध्दी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे