pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

भगवान धनगे यांना मानाचा “महाराष्ट्ररत्न समाजभूषण पुरस्कार” जाहीर

14 जून ला पुणे येथे पुरस्काराचे वितरण

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.19

ए. डी. फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य, तर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार सोहळा २०२५ ,पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे, या सन्मान सोहळ्यासाठी “महाराष्ट्ररत्न समाजभूषण पुरस्कार” साठी भगवान धनगे यांची निवड करण्यात आली आहे. अविस्मरणीय भव्य पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी मा. मंत्री, लोकप्रतिनिधी, कलावंत, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते इ. उपस्थित राहणार आहेत. सन्माननिय अतिथींच्या हस्ते भगवान धनगे यांना या पुरस्काराचे वितरण होणार आहे. हा पुरस्कार त्यांना उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून जाहीर झाला आहे.निवड पत्रात ए. बी फाउंडेशन ने असे म्हटले आहे की,तुम्ही जे पवित्र विधायक कार्य आपण हाती घेतले आहे ते तुमच्या हातून निरंतर घडत राहो,आपण करत असलेल्या उल्लेखनीय, प्रभावी कार्यातून एक सक्षम राष्ट्राच्या प्रस्थापनेचा प्रवाह भक्कम होऊन सखोल मानवीय अंतर्मनाचा चेहरा प्रफुल्लित सन्मुख होतो. तुम्ही कार्यरत असलेल्या क्षेत्रात तुम्ही तुमच्या कार्याचा ठसा उमटवला आहेच शिवाय आपल्या हातून होत असलेली राष्ट्रसेवा ही खरोखरंच अभिमानाची व कौतुकास्पद बाब आहे कष्टाची जाणीव व सत्याची कास धरुन चालतांना आपल्याकडं पाहिलं की आपण कार्यरत असलेल्या क्षेत्रामध्ये नव्याने येऊ पाहणाऱ्या युवकांना नक्कीच प्रेरणा मिळते. एक अष्टपैलू व्यक्तीमत्वं कसं असावं याचं उत्तम उदाहरण आपल्याकडं पाहिलं की लक्षात येतं. आपण सदैव आनंदी रहावे व इतरांना आनंदी करावे ही मनस्वी इच्छा! असे पुढे निवड पत्रात म्हटले आहे.

या निवडीबद्दल काजळा गावातील प्रतिष्ठित नागरिक,मित्र परिवार,नातेवाईक यांच्याकडून भगवान धनगे यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे तसेंच त्यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे