pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

चला जाऊ या ग्राम जयंती साजरी करूया:या अभियानाची सांगता

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

मोर्शी/त्रिफुल ढवले, दि 30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ११६ ग्राम जयंतीनिमित्त भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी द्वारा संचालित केंद्रीय प्रचार विभाग अंतर्गत तालुका प्रचार विभाग तिवसाच्या वतीने चला जाऊया या ग्रामजयंती साजरी करूया या अभियानाची सुरुवात फत्तेपूर जावरा येथून ०७ एप्रिल रोजी सुरुवात झाली. मागील सात वर्षापासून ही अभियान तालुकाभर यशस्वीरित्या राबवण्यात जात आहे. ३० एप्रिल हा दिवस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मदिवस ग्राम जयंती म्हणून संपूर्ण भारत वर्षामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. या अभियानाचा मारडा येथे समारोप करण्यात आला.सर्वप्रथम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेकडो गुरुदेव भक्तांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकनाथ महाराज गावत्रे तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रविना अंभोरे, गोपाल कडू, सुहास टप्पे, पंढरीनाथ जिरापुरे, दौलत धुर्वे, दोंडगे, गणेश राव घाटोल, सुभाषराव सोनारे, पोलीस पाटील सुधाकर पाटील, सरपंच मुकूंद पुनसे, किशोर आगर, बबिता पालिवाल आदी उपस्थित होते.यावेळी संपूर्ण मोहिमेमध्ये स्वयम् प्रेरणेने सहभागी झालेले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुभाष सोनारे यांनी तर प्रास्ताविक गणेश घाटोळ यांनी केले. आभार संजय टेकाडे यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे