pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.27

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दिवस 26 जून दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना या कार्यालयाच्या वतीने दि. 26 जून, 2025 रोजी सकाळी 10 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रम आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमास केलेल्या अध्यक्षीय भाषणात आमदार अर्जुन खोतकर यांनी राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांनी दुर्बल व पिडीत घटकांसाठी केलेल्या कार्याचा ऊहापोह करुन शाहु महाराजाचे शिक्षणविषयक कार्य व सामाजिक विषमता दूर करण्यासाठी घेतलेला पुढाकार आजच्या परिस्थितीतही तंतोतंत लागु असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्काराचा 5 हजार रुपयांचा धनादेश कु. प्रज्ञा अरविंद सोनकांबळे, मुलींची शासकीय निवासी शाळा, जालना या विद्यार्थीनींस वितरण करण्यात आला. तसेच संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळ यांच्यामार्फत सन 2017-18 मधील महिला समृध्दी योजनेअंतर्गत श्रीमती बेबी दशरथ जोहरे, देवका मगन जोहरे यांना प्रत्येकी रुपये 50 हजार रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला.

डॉ. निकेश मदारे यांनी यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक कार्याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश अंबुरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. दिलीप गिरी यांनी केले. रामेश्वर कर्दळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमास जिल्हा व्यवस्थापक तथा विभागीय अधिकारी अरुण राऊत, अनिल सुनगत, सुर्यकांता गोसावी, श्रीमती पाटोळे यांच्यासह नागरिक अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे