pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

“कर्मयोगीनी राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर”

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना, दि.30

 “कर्मयोगीनी राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर

भारत देशात अनेक राष्ट्रपुरुषांनी जन्म घेतला आहे. म्हणून भारताला थोरवीर रत्नांची खाण असे संबोधले जाते. अशातीलच एक महान स्त्री रत्न म्हणजे राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर होय. त्यांनी आपले समस्त जीवन लोक कल्याणासाठी अर्पण केले. त्यांची आज जयंती त्यानिमित्त त्यांच्या जीवन कार्याचा हा आढावा. त्यांनी जनते विषयी असणारी आत्मीयता, प्रेम आपुलकी जर आपणास पहावयाचे असेल तर त्यांच्या जीवन चरित्राचा आपल्याला अभ्यास करावा लागेल.
अहिल्यादेवी यांचा जन्म ३१ मे १७२५ आली, वडील माणकोजी शिंदे व आई सुशिलाबाई शिंदे यांच्या ‘ धनगर समाजात झाला. त्यांचें जन्मगाव अहमदनगर (अहिल्यादेवी) जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील सीना नदीच्या काठावर वसलेलं “चौंडी” हे होय. अहिल्याबाईनी आपल्या बालपणात विविध प्रकारचे शिक्षण परीक्षण घेतले. तत्कालिन दरबारी मोडी मराठी लिहिणे वाचणे, हिशोब करणे यांचे शिक्षण आत्मसात केले तसेच घोड्यावर बसणे दांडपट्टा खेळणे, राजकारणाचे व युद्धाचे डावपेच आखणे, लढाया करणे, तह करणे सूचक पत्रव्यवहार करणे न्यायदान आदीचे सूक्ष्म प्रशिक्षण घेतले. परिणामी त्यांची शारीरिक मानसिक सामाजिक दृष्ट्या बुध्दी परिपक्व झाली.
अहिल्याबाई यांचा विवाह राजश्री मल्हारराव व महाराणी गौतमाबाई यांचा १२ वर्षाचा एकुलता एक मुलगा शूरवीर खंडेराव यांच्याशी वयाच्या नवव्या वर्षी २० मे १७३३ साली संपन्न झाला. इ. स. १७४५ ला मुक्ताबाई व मालेराव अशी दोन अपत्य अहिल्यादेवी यांना झाली. अहिल्यादेवी यांचे पती शूरवीर खंडेराव कुंभेरीच्या रणसंग्रामात शहीद झाले. आणि त्यांच्यावर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. इ. स.१७६६ मध्ये सासरे राजश्री मल्हारराव यांच्या मरणोपरांत अहिल्यादेवीनी इंदोर (मध्यप्रदेश) राज्याची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली.
शासन व्यवस्था आपल्या ताब्यात घेतल्यानंतर आहील्यादेविनी अनेक समाजोपयोगी कार्य केली. ज्याचा आज उल्लेख केल्याशिवाय या लेखाला पूर्णत्व प्राप्त होणे शक्य नाही. भारत हा कृषिप्रधान देश आहे येथील लोकजीवन शेतीवरच अवलंबून आहे. त्यासाठी त्यांनी शेतकऱ्याला आर्थिक मदतीचा हात दिला. कर वसुलीची मर्यादा निश्चित ठरवून दिली त्यामुळे शेतकऱ्यांना जादा शेत सारा द्यावा लागत नसे. शेती पूर्णतः पाण्यावर अवलंबून असल्यामुळे तलाव विहीर घाट व कुंडाची निर्मिती केली. शेतीला पूरक असे उद्योग चालू केले.
अहिल्यादेवी यांच्या शासन व्यवस्थेच्या काळात अनेक मंदिरे, मस्जिदी धर्मशाळा, रस्ते दवाखाने यांची निर्मिती केली. त्यामुळे वस्तुशिल्पी, शिल्पकार, गवंडी, लोहार, सुतार,सोनार, चर्मकार अशा अनेक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. कलावंत साहित्यिक, व कारागीर अशा गुणी लोकांच्या विकासासाठी जमीन, घर पैसा व इतर सोयी सुविधा उपलब्ध केल्या.
सर्वधर्म समभावाचा आदर्श गिरवीत त्यांनी जुनी मंदिर व मस्जिदी यांचा जीर्णोद्धार केला. त्यांची साक्ष देत आजही काही वास्तू उभ्या आहेत. जसे कि परळी येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिराची सुधारणा केली. तसेच त्यांनी अनेक पीर व मस्जिदी बांधल्या, खडेपीर, चांदवड, येथील नानावली दर्गा, या ठिकाणची जीर्णोद्धाराची कामे त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केली. राज्यांतील प्रजेच्या रक्षणासाठी सैन्य व्यवस्था स्त्री सैन्य, पोलीस प्रशासन यांची नेमणूक केली. परराज्यातील वकिलांची नेमणूक करुन न्याय व्यवस्था बळकट केली.
राज्यकर्त्यांची भूमिका पार पाडत असताना त्यांनी समाज सुधारकांची भूमिकाही त्यांनी निर्भिडपणे पार पाडली. कोणत्याही समाज सुधराकाचा आपण अभ्यास केला. तर आपल्याला असे जाणवेल त्यांचें समाज परिवर्तनाचे कार्य हे तीन अवस्थामधून पुढे जात असते. उपहास विरोध आणि स्वागत काळाच्या पुढे पाहणाऱ्या दृष्ट्याचा नेहमीचं उपहास होतो म्हणुन विरोध हा आलाच. परंतु कालांतराने याचेच स्वागत होते. याचे जर उदाहरण पाहायचे झाले तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले समाज सुधारक होत्या. त्यांनी मुलींना शिक्षणं देण्याचा एतिहासिक निर्णय घेतला. त्यांना सुरुवातीला खूप टीका त्रास उपहास सहन करावा लागला. प्रखर विरोध झाला परंतु कालानुरूप त्याचेही स्वागत झाले. त्याच प्रमाणे अहिल्यादेवी यांना शासन चालवत असताना अनेक अडचणीला सामोरे जावे लागले. तरीपण त्या डगमगल्या नाहीत. अहिल्यादेवी राज्यकारभार चालवताना अनिष्ट रूढी समाजविघातक परंपरा यांना पायबंद घातला. हुंडा देणे आणि घेणे दोन्ही अपराध मानले जाऊ लागले. दारुबंदी, सतीप्रथा बालविवाह, केशवपन या अनिष्ट प्रथा बंद केल्या. त्यांनी त्यासाठि कठोर कायदे केले व त्याची प्रभावीपने अमलबजावणी केली. अहिल्यादेवी म्हणत ज्या रूढी अंधकाराकडून प्रकाशाकडे नेतात त्या रूढी आम्हाला मान्य आहेत परंतु प्रकाशाकडून अंधाराकडे ज्ञानकडून अज्ञानाकडे नेणाऱ्या रूढी आम्हास मान्य नाही.
शासनकर्ता हा जनतेच्या पैशाचा मालक नसतो तर तो त्यांचा विश्वस्त असतो त्या पैशाची उधळपट्टी करण्याचा त्यास काहीही अधिकार नाही असे त्यांचे तत्व होते. अहिल्यादेवी यांचा राज्यकारभार समर्पित वृत्ती धर्मपारायणात, परधर्म सहिष्णुता, अन्यायाची चीड दुर्बलांचे रक्षण स्वातंत्र, समता बंधुता न्याय, विकास दुष्टांना शासन आणि गुणवंतांना आसन अशा तत्वावर चालत असे.
आपण इतिहासातील अनेक राष्ट्रपुरुषांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करतो तेंव्हा आपल्याला असे जाणवते की अशा व्यक्तीचे जीवन म्हणजे एक संघर्ष यात्राच असते. मग याला अहिल्यादेवी कशा अपवाद ठरतील. त्यांना स्वतःच्या जवळीक आप्तेष्टांचा विरह पहावा लागला. तत्कालीन समाजामध्ये एका स्त्रीने राज्यकारभार चालवावा म्हणजे एक दिव्यच शत्रू राष्ट्रांची* *आक्रमणे ब्रिटिशांची राज्यावरील नजर, राज्यकारभारातील अंतर्गत कलह, वाईट प्रथा बंद करण्यासाठी झालेला* समाजातील दुष्ट लोकांचा विरोध अशा एक ना अनेक संकटांना त्यांनी समर्थपणे तोंड दिले
कदाचित याही कारणामुळे इतिहासाला त्यांची नोंद घ्यावी लागली असेल.
संधी आणि स्वकर्तृत्व यांची बेरीज म्हणजे अहिल्यादेवी होळकर. त्यांना राज्यकारभार चालवण्याची संधी मिळाल्यावर आपल्या स्व: निर्णयावर त्यांनी संधीचे सोने केले व इतिहासात आपल्या कार्याचा ठसा उमटवला. नेतृत्व कायम तडजोडीची भाषा बोलत नसते त्याचप्रमाणे त्यांनी जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांविषयी कधीही तडजोड केली नाही.
अहिल्यादेवी होळकर या आपल्या समाजासाठी अखंड ऊर्जादायी प्रेरणास्त्रोत आहे. आज समाजातील लोकांना शिक्षणाचे महत्व जाणवले आहे. त्यामुळे समाज प्रगती करत आहे. पण यावर समाधान मानून चालणार नाही. खूप मोठ्या प्रमाणात प्रगती करावयाची आहे. अडचणी खूप आहेत पण यातूनही मार्ग काढणे गरजेचे आहे. राजकीय स्तरावर आरक्षण असेल किंवा इतर मागण्या त्यासाठि सातत्याने पाठपुरावा होणे आवश्यक आहे. आपला जो हक्क आहे. त्याबाबत सर्वांनी जागरूक असणे ही खूप चांगली गोष्ट आहे. पण कर्तव्याबाबत आपण कसूर करता कामा नये. आज अहिल्यादेवी यांची जयंती साजरी करत असताना अहिल्यादेवीच्या विचारांचा व कार्याचा देदीप्यमान वारसा आपल्याला समोर ठेवून वाटचाल करावी लागेल युवकांनी आजच्या दिवशी किंवा मिरवणुकी पुरते महत्व न देता सातत्याने विधायक कार्य करत राहीले पाहिजे. युवकांनी शिक्षणं शेती उद्योग नोकरी यामध्ये झोकून देऊन अपार कष्ट करण्याची मानसिकता तयार ठेवावी. शिक्षणं तंत्रज्ञान नवीन बदल आत्मसात करुन आपली आपल्या कुटुंबाची समाजाची पर्यायाने देशाची प्रगती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. कोणत्याही समाजाची, राष्ट्राची प्रगती तेथील युवकावरच अवलंबून असते. युवकांनी याबाबत जागृत असणे गरजेचे आहे. सामाजिक संघटनांनी देखिल समाजाची विधायक प्रगती होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. समाजाच्या शक्तीचा, वेळेचा,संपतीचा अपव्यय होणार नाही सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. अहिल्या देवी यांचा आदर्श समोर ठेवून वाटचाल करावी.
राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर घोड्यावर बसून युद्ध करणाऱ्या रणरागिणी होत्या. संकट समयी धैर्य दाखविणाऱ्या वीरांगना होत्या. राजदरबारात बसून न्याय देणाऱ्या शासन कर्त्या होत्या. समस्त भारतीय जनतेला पुत्रवत मानणाऱ्या संपूर्ण राष्ट्रात जन हिताचे कार्य करणाऱ्या राष्ट्रमाता होत्या. अशा या राष्ट्रमातेचे निधन १३ ऑगस्ट १७९५ साली झाले. इतिहासातील एक देदीप्यमान अध्याय संपुष्टात आला. त्यांच्या कार्य कीर्तीचा सुगंध कायम दरवळत राहील यात काही शंका नाही. अशा या भारतभूमीतील स्त्री रत्नाची २९९ वी जयंती निमित्त त्यांच्या या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.

संकलन
श्री.गलांडे ए. बी.(सर)
(निवेदक)
मो.९५६१२४९७६९.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे