डाक अदालतीचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि. 8
टपाल विभागाकडून सेवा देतेवेळी काही त्रुटीमुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार करण्याची वेळ येते. या तक्रारीचा योग्य न्याय निवाडा करण्यासाठी पोस्टा खात्याने वेळोवेळी डाक अदालत घेण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये डाक विभागाचे अधिकारी तक्रार सोडविणार आहेत. तरी डाक अदालत प्रवर अधिक्षक डाकघर, छत्रपती संभाजीनगर येथे दि.13 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. विशेषत: टपाल वस्तु, मनी ऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र इत्यादीच्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार आहेत. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असणे आवश्यक आहे. आपल्या तक्रारी 11 ऑक्टोबर 2025 पर्यंत दाखल कराव्यात, असे आवाहन प्रवर अधिक्षक डाकघर, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.


