[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनीधी,दि.6
जालना – नांदेड समृद्धी महामार्गासाठी संपादीत होणाऱ्या जमिनीतील फळबागांना योग्य दर निश्चित करून त्याबाबतचा शासन निर्णय काढण्यात यावा अशी आग्रही मागणी जालन्याचे आ. कैलास गोरंटयाल यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंढे यांच्याकडे आज मंगळवारी लेखी पत्राद्वारे केली आहे.
जालना – नांदेड या समृध्दी महामार्गावरील शेतजमिनी संपादित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा आ. कैलास गोरंटयाल यांनी दि. २ ऑगस्ट शुक्रवार रोजी जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे मांडून अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली होती.त्यावेळी जिल्हाधिकारी पांचाळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारकडे त्याबाबत प्रस्ताव पाठवणार असल्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, आ. कैलास गोरंटयाल यांनी आज मंगळवारी याच प्रश्नासाठी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंढे यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेतली. जालना – नांदेड समृद्धी महामार्गाची अधिसुचना ही २०२१ साली कोविड महामारीचे निर्बंध असतांना काढण्यात आलेली आहे. कोरोना महामारीमुळे बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे जालना – नांदेड समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या शेतजमिनीतील द्राक्ष, डाळींब, सिताफळ, जांब या फळझाडांचा दर कमी निघाला असून या तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान होत आहे. प्रशासन या अडचणींची दखल घेत नसल्याने जमीन संपादनासाठी शेतकरी संमती देखील देत नसल्याचे आ. गोरंटयाल यांनी कृषिमंत्री धनंजय मुंढे यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. यापूर्वीच्या मुंबई – नागपूर या समृद्धी महामार्गासाठी संपादित जमिनीच्या दरापेक्षाही कमी दर फळझाडांना दिला आहे. याबाबत योग्य ते आदेश काढून शेतकऱ्यांना संपादीत होणाऱ्या शेतजमिनीच्या फळझाडांचा चालू वर्षाचा सुधारित दर देण्याबाबतचे आदेश काढून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आ. कैलास गोरंटयाल यांनी यावेळी केली. कृषिमंत्री धनंजय मुंढे यांनी या प्रकरणी तातडीने दखल घेऊन दर वाढवून देण्याबाबतचे सुधारित शासन आदेश काढण्याची ग्वाही दिली. यावेळी रामनगर येथील गोपाल मोरे,गणेश गिराम यांची उपस्थिती होती.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


