महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे लाभार्थ्यांना आवाहन
जालना/प्रतिनिधी,दि. 7
महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपुर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्याची एकरक्कमी परतावा योजना दि.31 मार्च 2026 पर्यंत राबविण्यात येत आहे. त्यानूसार महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थींनी या योजनेचा फायदा घेवून कर्जमुक्त व्हावे, अधिक माहितीसाठी पात्र लाभार्थ्यांनी जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जालना येथे संपर्क क्रमांक 02482 -223420 यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.


