pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये जमावबंदी आदेश जारी

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.

जालना जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यात पाच (5) किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी सोहम वायाळ यांनी जारी केले आहेत.

जालना जिल्ह्यात दि. 4 जुन 2024 रोजी 18-जालना लोकसभा मतदार संघाची मतमोजणी होणार आहे. तसेच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण बचाव व धनगर समाज एस.टी. प्रवर्गात समाविष्ठ करावे या अनुषंगाने जालना जि्ल्हयात विविध प्रकारचे आंदोलन कार्यक्रम सुरु आहेत. त्यामुळे अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. तसेच सध्या महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकांविरुध्द गटबाजी व आरोप प्रत्यारोप विविध कारणावरुन सुरु आहेत. तसेच शेतक-यांचे विविध मागण्यासाठी विविध संघटनाकडुन आत्मदहन, उपोषण, धरणे मोर्चे, निर्देशने, रास्ता रोको आदि सर्व प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा आदेश कामावरील कोणतेही अधिकारी-कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही. तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागातील पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूका, सभा, मोर्चा यांना लागू होणार नाही. हा आदेश संपूर्ण जिल्ह्यासाठी दि. 2 जुन 2024 रोजीचे 6 वाजेपासून ते दि. 15 जुन 2024 रोजीचे 24 वाजेपर्यंत अंमलात राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे