pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पूर्वतयारीकरीता प्रशिक्षण संपन्न

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.23 

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 प्रक्रियेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली  उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अधिकारी यांच्या सार्वत्रिक निवडणूक पूर्वतयारी  प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.

विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने यावेळी  प्रशिक्षणात पात्रता-अपात्रता, नामाकंन, गुन्हेगारी पूर्ववृत्तांबद्दल सूचना, नामांकन सुरक्षा, मतदान केंद्र तपासणी, अतीसंवेदनसिल मतदान केंद्र निश्चित करणे, मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्राचे नियोजन, एमसीएमसी, पेड न्यूज, आदर्श आचारसंहितेचा भंग, स्वीप, ईव्हीएम-व्हीव्हीपॅट, पोस्टल मतदान,  सी-व्हीजील प्रणाली आदी विषयावर सविस्तर माहिती देण्यात आली.

प्रारंभी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले की, विधानसभा निवडणूकीसाठी खुप कमी कालावधी राहिला आहे. याकरीता निवडणूक प्रक्रियेतील सर्व यंत्रणांनी निवडणुकीच्या कामाचे सुक्ष्म नियोजन करुन जबाबदारीने कामे पार पाडावीत. तसेच सोपविण्यात आलेल्या जबाबदारीची पूर्वतयारी करावी.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार,जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, जिल्हा सूचना अधिकारी आर. पी. पडळकर,उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, उपविभागीय अधिकारी दिपक पाटील, डॉ. दयानंद जगताप, पद्यमाकर गायकवाड यांनी निवडणूकीच्या अनुषंगाने विविध विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी प्रशिक्षणास सर्व तहसिलदार, नायब तहसिलदार यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे