pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.1 

 इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरू करण्यात आली आहे. सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी दि. 30 सप्टेंबर 2025 ते 26 ऑक्टोबर 2025 या कालावधीत 12 वी नंतरच्या बिगर व्यावसायिक,  व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत. आणि या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी व वसतिगृह प्रवेशापासून वंचित असलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेसाठी प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. यावर्षीची दि. 1 सप्टेंबर 2025 पासून वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे