pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित उरण शहर शाखेतर्फे अभिवादन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.23

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ९८ व्या जयंतीनिमित मंगळवार दिनाकं २३ जानेवारी २०२४ रोजी उरण शहर शाखेतर्फे भावपूर्ण आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी शहरप्रमुख सुजन शिरधनकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले तर माजी नगरसेवक निलेश भोईर यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहारअर्पण करण्यात आले व महिला उपजिल्हासंघटिका ममता पाटील यांच्या हस्ते माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच उपस्थित शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली.

या वेळी माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे,माजी शहर संघटक महेश वर्तक, विधी व न्याय तालुका उपाध्यक्ष मच्छिंद्रनाथ घरत, महिला आघाडीच्या तालुका संघटिका(शहर) सुजाता गायकवाड, तालुका संपर्क संघटिका प्रणिता म्हात्रे, शहर संघटिका मेघा मेस्त्री, संपर्क संघटिका श्रीमती वंदना पवार, उपशहर संघटिका रझिया शेख, माधुरी चव्हाण, उपतालुका संघटिका मनीषा ठाकूर, माजी तालुका संघटिका रंजना तांडेल, अल्पसंख्याक सेलच्या शहर अध्यक्ष मुमताज भाटकर, उपाध्यक्ष सायरा खान, महिला शाखा संघटिका हसीमा सरदार, कविता गाडे, शाखाप्रमुख विकी म्हात्रे, अजय म्हात्रे, प्रदीप शेळके, गटप्रमुख संदीप चव्हाण, गुरुनाथ रेड्डी, रियाज मुकादम, ज्येष्ठ कार्यकर्ते श्री माळी, उपशाखाप्रमुख शाहरूख गडी, फतेह खा, सर्व आजी-माजी पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे